record number of 4 62 735 people were in the state yesterday 
मुंबई

अभिमानास्पद! महाराष्ट्रात एका दिवसात विक्रमी लसीकरण

भाग्यश्री भुवड

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. तर, दुसरीकडे लसीकरणाची मोहीमदेखील तितक्याच जलद गतीने राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे लसीकरण करण्यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर ठरत असून एकाच दिवसात विक्रमी लसीकरण करणारं हे पहिलं राज्य ठरलं आहे. याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
"राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाने वेग घेतला असून काल ३ एप्रिल रोजी एकाच दिवसात ४ लाख ६२ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले. एकाच दिवसात एवढ्या उच्चांकी संख्येने लसीकरण करण्याची देशातील ही पहिलीच वेळ असून त्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविला गेला आहे," असं ट्विट राजेश टोपे यांनी केलं आहे.

गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकीत महाराष्ट्राने आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांचे लसीकरण करून देशात अग्रभागी राहण्यात सातत्य राखले आहे. 

राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण देण्यास सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता. काल ३ एप्रिल रोजी राज्यभर ४१०२ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या पार करत ४ लाख ६२ हजार जणांना लस देण्यात आली. कालदेखील पुणे जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ७६ हजार ५९४ जणांना लसीकरण करून राज्यात अग्रस्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर (४६ हजार ९३७), नागपूर (४१ हजार ५५६), ठाणे (३३ हजार ४९० ) या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

संपादन - शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT