Mumbai Rain sakal
मुंबई

Mumbai Rain : मुंबईत २४ तासांत विक्रमी पाऊस

शहरात काल-आज मिळून २४ तासांत विक्रमी पाऊस पडला. २४ तासांत मुंबईतील अनेक भागांमध्ये २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. शहरात या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शहरात काल-आज मिळून २४ तासांत विक्रमी पाऊस पडला. २४ तासांत मुंबईतील अनेक भागांमध्ये २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. शहरात या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत आहे. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत जोरदार पाऊस सुरू आहे. पालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रावर नोंदवलेल्या आकडेवारीनुसार रविवारी (ता. २१) सकाळी आठ ते सोमवारी (ता. २२) सकाळी आठ या २४ तासांत मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

सर्वाधिक जास्त पाऊस (आकडे २०० मिलिमीटरमध्ये)

शहाजीनगर पालिका शाळा (ट्रॉम्बे मानखुर्द): २४१, नूतन विद्यामंदिर (मानखुर्द) ः२२४, नाडकर्णी पार्क महापालिका शाळा (वडाळा) :२२३, ‘एन’ प्रभाग कार्यालय (घाटकोपर) ः २१५, मानखुर्द अग्निशमन केंद्र :२१२, आदर्शनगर महापालिका शाळा (वरळी)ः २०४, शिवडी कोळीवाडा :२०३. रमाबाई महापालिका शाळाः २०२

मुसळधारेची शक्यता

कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यादरम्यान काही भागात अतिवृष्टीचा अंदाजदेखील आहे. यामुळे नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन वेधशाळेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Security: चारधाम यात्रेच्या सुरक्षेसाठी ‘नभ नेत्र’ ड्रोन; ५ किमी परिसरातील भाविकांवर ठेवणार नजर

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT