मुंबई विमानतळावरील धावपट्टी 
मुंबई

मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर पाच महिने रेड सिग्नल

​सकाळ वृत्तसेवा

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाची पावसामुळे खराब झालेली मुख्य धावपट्टी दुरुस्तीसाठी 4 नोव्हेंबरपासून पाच महिने दररोज आठ तास बंद राहणार आहे, असे मुंबई विमानतळाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. उड्डाण बंद ठेवल्याने त्याचा परिणाम निश्‍चितच विमान सेवेवर होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या धावपट्टीवरून विमानांची उड्डाणे आणि आगमन होणार आहे. परिणामी विमान तिकीटदरात 50 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होण्याचीही शक्‍यता आहे. 

विमानतळाची मुख्य धावपट्टी पावसामुळे खराब झाली आहे. खराब झालेली ही धावपट्टी दुरुस्तीसाठी 4 नोव्हेंबर 2019 ते 28 मार्च 2020 पर्यंत दररोज सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान बंद राहणार आहे. त्यामुळे त्या आठ तासांत या धावपट्टीवरून कोणत्याही विमानांची उड्डाणे होणार नाहीत, अशी माहिती मुंबई विमानतळाच्या प्रवक्‍त्याने दिली. 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वांत व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. येथील दोन धावपट्ट्यांपैकी मुख्य धावपट्टीवरून तासाला 46 विमानांचे आगमन व उड्डाण होते; तर दुय्यम धावपट्टीवरून तासाला 35 विमानांचे उड्डाण व आगमन होते. या विमानतळावरून दिवसाला सुमारे 970 विमानांचे उड्डाण आणि आगमन होते. 

तिकीट दरावर परिणाम 
विमानतळावर एकमेकांना भेदणाऱ्या दोन धावपट्ट्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोन धावपट्ट्या जिथे जुळतात, त्याच भागात दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे या दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवाव्या लागणार आहेत. मुख्य धावपट्टी दुरुस्तीसाठी पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे तिकीटदरावरही परिणाम होणार आहे. 29 मार्च 2020 नंतर मात्र विमान वाहतूक पूर्ववत होणार आहे. 

या दिवशी धावपट्टी सुरू असेल 
25 डिसेंबर 2019, 1 जानेवारी 2020, 15 जानेवारी 2020, 19 जानेवारी 2020, 21 फेब्रुवारी 2020, 10 मार्च 2020, 25 मार्च 2020. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT