railway  sakal
मुंबई

आयआरएसडीसीद्वारे स्थानकांचा होणार पुनर्विकास

सीएसएमटी, दादर, कल्याण, अंधेरीसह बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानकाचे नुतनीकरण, पुनर्विकास करण्याचे काम सुरू आहे. हे काम भारतीय रेल्वे स्थानक पुनर्विकास महामंडळ(आयआरएसडीसी)द्वारे करण्याची योजना आखली आहे. सध्या आयआरएसडीसीद्वारे सीएसएमटी, दादर, कल्याण, अंधेरीसह बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानकाच्या रचनेत, सोयी-सुविधांमध्ये अत्याधुनिक बदल करून प्रवासीभिमुख सेवा देण्यात येणार आहेत.

रेल्वे स्थानकात सध्या पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट या प्रवाशांसाठी सुविधा उभारल्या जात असून यात वाढ केली जात आहे. बोरीवली स्थानकात मागील काही वर्षात दहा फलाट असून पाच पादचारी पूल, सात सरकते जिने, सात लिफ्ट आहेत. आणखी तीन सरकत्या जिन्यांचीही भर भरणार आहे. सध्या पादचारी पुलांना स्काॅयवाॅकचीही जोड दिली आहे. तर, पश्चिमेला प्रवाशांना स्थानकापर्यंत येण्यासाठी डेकही उपलब्ध केला आहे.

आयआरएसडीसीद्वारे बोरिवली स्थानकाचे पुनर्विकास करत आहे. हे काम प्राथमिक टप्प्यात असून त्यासाठी सल्लागार नियुक्ती प्रगतीपथावर आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून बोरीवली स्थानक ओळखले जाते. तर, कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांची संख्या देखील बोरीवली स्थानकातून सर्वाधिक वाढत आहे. त्यामुळे गर्दी विभाजन करण्यासाठी, या स्थानकाच्या पश्चिम आणि पूर्वेला रेल्वे हद्दीचा आणखीन विकास करता येईल का, याचे नियोजन आयआरएसडीसीकडून केला जाणार आहे. स्थानकात वाहनतळ, दिव्यांगस्नेही स्थानक, येण्या-जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग, रेल्वे माॅल तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT