मुंबई

आरोग्य सेविकांना तुटपुंजी भाऊबीज भेट; मुख्यमंत्र्यांनी कौतुक करूनही बोनसच्या नावाने पदरी निराशाच

भाग्यश्री भुवड


मुंबई : मुंबई पालिका क्षेत्रातील आरोग्य सेविका जीवाची पर्वा न करत कोरोना काळात सेवा देत आहेत. मात्र, 15 हजार रुपये बोनसऐवजी अवघ्या 4,400 रुपयांची भाऊबीज देऊन त्यांची बोळवण केली असल्याचा आरोप होत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी कामाची प्रशंसा करूनही बोनसबाबत दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य सेविका नाराज असून त्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गंभीर म्हणजे, 300 आरोग्य सेविकांना भाऊबीज भेटीच्या यादीतूनच वगळण्यात आल्याने त्यांच्या नाराजीत भर पडली आहे. 

मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे चार हजार आरोग्य सेविका काम करतात. कोरोना संकटाच्या काळात आरोग्य सेविकांनी चांगली कामगिरी केली असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांचे कौतुक केले होते. आरोग्य सेविकांमुळे मुंबईतील कोरोना संक्रमणावर पालिकेला नियंत्रण मिळवता आले, असे ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले होते. आरोग्य सेविका घटक महत्त्वाचा असूनही त्यांना तुटपुंजी भाऊबीज भेट घोषित करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय, 300 आरोग्य सेविकांना भाऊबीज रकमेच्या लाभातून वगळण्यात आल्याने तीव्र पडसाद उमटत आहेत. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आरोग्य सेविकांनी व्यक्त केली असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

300 आरोग्य सेविकांना वगळले 
किमान 15 हजार रुपये बोनस आरोग्य सेविकांना मिळणे क्रमप्राप्त होते. असे असताना त्यांची केवळ 4400 रुपयांवर बोळवण केली गेली आहे. त्यातही 300 जणींना वगळण्यात आले असल्याने प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे संतापलेल्या आरोग्य सेविका कोणताही अप्रिय निर्णय घेऊ शकतात, असे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास म्हणाले. 

महापौरांचे आश्‍वासन हवेतच 
आरोग्य सेविकांना भाऊबीज रकमेतून वगळण्यात येणार नाही. वगळण्यात आलेल्या 300 आरोग्य सेविकांना भाऊबीज भेट देण्याबाबत घोषणा करण्यात येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप तशी कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास यांनी सांगितले. 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT