airplane  sakal
मुंबई

Airplane News: आधी करा नियोजन मग करा प्रवास; उन्हाळ्यात विमान प्रवास इतक्या टक्क्यांनी महागणार! 

सकाळ वृत्तसेवा

Airplane News: देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर होत असलेली हवाईकोंडी ,विमानाच्या इंधनाचा होत असलेला अपव्यय यामुळे भारतीय विमान प्राधिकरणाने विमानांच्या संख्येत कपात करण्याचे निर्देश मुंबई विमानतळाला दिले होते.

यामुळे विस्तारा,अकासा,इंडिगो या आघाडीच्या विमान कंपन्यांनी विमानांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची संख्या जास्त आणि विमानांची संख्या कमी होणार असून येत्या उन्हाळ्यात मागणी वाढल्याने विमान प्रवास किमान २५ टक्यांनी महागणार आहे.

 मुंबई विमानतळावर गर्दी वाढत आहे , धावपट्टीवर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत आहे. त्यामुळे विमानतळाच्या हवाई क्षेत्रात वाहतूक कोंडी होत असून विमानांना धावपट्टीवर उतरायला विलंब होतो .४० ते ६० मिनिटे शहरावरून घिरट्या घालाव्या लागतात. एखादे विमान दर तासाला सरासरी दोन हजार किलो इंधन वापरते असे गृहित धरता, एवढा कालावधी हवेत फेऱ्या मारल्यामुळे विमानाच्या इंधनाचा लक्षणीय अपव्यय होतो.

४० मिनिटे हवेत फेऱ्या मारण्यासाठी १.७ किलो लिटर (सुमारे १.८ लाख रुपये खर्च) तर ६० मिनिटे हवेत घिरट्या घालण्यासाठी जवळजवळ २.५ किलो लिटर (सुमारे २.६ लाख रुपये खर्च) इंधन वाया जाते. इंधनाच्या या वाढत्या खर्चाचा भार सरतेशेवटी ग्राहकांनाच उचलावा लागतो.त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मुंबई विमानतळाला विमानांची संख्या कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

प्राधिकरणाच्या निर्देशानंतर अनेक एअरलाइन्सनी बुधवारपासून विमानंच्या संख्येत कपात केली. आघाडीवर असलेल्या इंडिगो कंपनीने १५ फेब्रुवारीपासून काही विमान रद्द केली आहेत. अकासा एअरने मुंबई आणि बेंगळुरू दरम्यानची QP १३७४ (मुंबई ते बेंगळुरू) आणि QP १३६२ (बेंगळुरू ते मुंबई) उड्डाणे ३० मार्चपर्यंत रद्द केली आहेत. विस्ताराने १९ ते ३० फेब्रुवारी दरम्यान दररोज आठ उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आठवड्याला सुमारे ४० विमान रद्द होणार आहेत.

तिकिटदरात वाढ

मार्ग--------------१९ फेब्रुवारी-----------------मे

मुंबई-दिल्ली-----५,५००रु-----------६,६००च्या पुढे

मुंबई-बेगळुरु-------४,२७१रु-----------४,५३५च्या पुढे

मुंबई-चैन्नई---------३,५००रु------------४,०००च्या पुढे

मुंबई-कोलकत्ता-------६,५००रु----------७,७३६च्या पुढे

मुंबई-श्रीनगर--------१०,३६६रु---------१२,३९७ च्या पुढे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आषाढी वारीत यंदा पहिल्यांदाच ‘बीबीपीपीडीआर’ प्रणाली! जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची माहिती; ५५० मोबाईल अन्‌ यंत्रणेसाठी तीन कोटींचा खर्च, वाचा...

IND vs ENG Test: पहिल्या दिवशी लॉर्ड्सवर अटीतटीचा थरार; मानधना, हरमनप्रीत अन् दीप्तीची अर्धशतकं, इंग्लंड २६४ धावांनी पिछाडीवर

सोलापूर शहर पोलिसांची कामगिरी! हमालाच्या पत्नीचे सौभाग्याचे लेणं चोरणारे दोघे जेरबंद; ६ महिन्यांपूर्वी गड्डा यात्रेत महिलेचे दागिने चोरी, पोलिसांनी तो चोरटा पकडलाच, वाचा...

Monsoon Update News : मान्सूनला अचानक ब्रेक ‘अल निनो’चा प्रभाव वाढला; शेतकऱ्यांसह सामान्य चिंतेत, राज्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2026

SCROLL FOR NEXT