मुंबई

ठाण्यातील पुरुषांचे आरोग्याकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कामाच्या धकाधकीच्या काळात ठाण्यातील पुरुषवर्गाकडून आपल्या आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याची महत्त्वाची बाब समोर आली आहे. याबाबत डिजी ठाणे, ज्युपिटर हॉस्पिटल आणि ठाणे स्मार्ट लिमिटेडच्या वतीने आरोग्याचा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये केवळ ३५ टक्के पुरुष व्यायामासाठी वेळ देत असल्याचे समोर आले आहे; तर ७० टक्के पुरुष आरोग्याची नियमित तपासणी करीत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शहरातील कामगारवर्गासाठी आरोग्य हे सतत दुर्लक्ष असलेला विषय मानला जातो. ज्युपिटर हॉस्पिटलने नोव्हेंबरचा महिना मो-वेम्बर (Mo-vember) म्हणून साजरा केला. मो-वेम्बर हे पुरुषांच्या आरोग्यावर एक जागतिक मोहीम आहे. या मोहिमेंतर्गत पुरुष आपली मिशी वाढवून, पुरुषांच्या आरोग्याचे समस्यांवर जागरूकता निर्माण करतात.

ज्युपिटर हॉस्पिटलच्या सर्व पुरुष डॉक्‍टर्स व स्टाफने आपली मिशी वाढवून, आपल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पुरुषांमध्ये होणारे आजार, जसे की प्रोस्टेट कॅन्सर, टेस्टिक्‍यूलर कॅन्सर आणि मानसिक आजार, याविषयी माहिती व मार्गदर्शन केले.

मो-वेम्बर या मोहिमेंतर्गत, ज्युपिटर हॉस्पिटल आणि ठाणे महानगर पालिकेच्या डिजी ठाणे यांनी शहरातल्या पुरुषांसोबत एक सर्वेक्षण केले. जेथे पुरुष आपल्या आरोग्याला किती प्राधान्य देतात, हे कळून आले. 

६० टक्के पुरुष कुटुंबासाठी वेळ देऊ शकत नाहीत
खासगी नोकरी करणारे स्वतःसाठी खूप कमी वेळ खर्च करतात. जवळजवळ ६० टक्के पुरुष आपले मित्र आणि कुटुंबीयांना कमीत कमी वेळ देतात, असे या सर्व्हेत दिसून आलेले आहे. ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पुरुषांना आपले छंद पाळणे व त्याचसाठी वेळ देणे हे अशक्‍य झाले आहे. डॉ. अमित सराफ रुग्णांना स्वतःसाठी वेळ काढण्याचा सल्ला देत आहेत. १ डिसेंबर रोजी धावण्याचे महत्त्व ठाण्यातील नागरिकांना पटवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविला जाणार आहे.

आपल्या कामात आणि परिवाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये, पुरुष आपल्या आरोग्याला सर्वात जास्त दुर्लक्ष करतात, असे या सर्व्हेतून व्यक्त झाले आहे. सर्वाधिक सहभागींना पुरुषांमध्ये मोठ्या प्रणामावर वाढत असलेल्या कॅन्सर या आजाराविषयी विशेष माहिती नव्हती. सध्याच्या धावपळीच्या काळात पुरुषांमध्ये मोठ्या प्रणामावर वाढत असलेल्या कॅन्सरबद्दल  जागरूक असणे गरजेचे आहे. 
डॉ. स्वप्नील कपोटे, कर्करोगतज्ज्ञ, ज्युपिटर हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Nawale: निर्मला नवले यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी; जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवानंतरही संघटनेत स्थान

Uruli Kanchan Garbage: उरुळी कांचनमधील पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेजच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्यांचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे ‘कचरा स्वागत’

Marathi News Live Updates: कपिल सिबल यांनी निवडणूक आयोगाकडून झालेली एक गंभीर चूक निदर्शनास आणून दिली - अनिल देसाई

Pune illegal hill cutting issue: पुण्यात टेकडीफोडीला लगाम घाला; बेकायदेशीर बांधकामे थांबवा, परवानग्या रद्द करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

Pune Civic Tenders: महापालिकेच्या रखडलेल्या शेकडो कोटींच्या निविदा दोन दिवसांत मार्गी लावा; राजकीय दबावाला बळी न पडण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश

SCROLL FOR NEXT