लाच घेताना पकडले 
मुंबई

लाच घेताना दुय्यम निबंधकांना रंगेहाथ पकडले; वाड्यात लाचलुचपत विभागाची कारवाई

दिलीप पाटील

वाडा  ः वाड्याचे प्रभारी दुय्यम निबंधक सर्जेराव चाटे यांना एका बांधकाम व्यावसायिकांकडून गाळ्यांची नोंदणी करण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना पालघर लाचलुचपत विभागाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी बांधलेल्या दत्तात्रेय अपार्टमेंट इमारतीमधील गाळा नंबर 10 व 11 यांची विक्री करण्यात आली असून त्याचे नोंदणी करणे बाकी होते. सदर गाळ्यांचे रजिस्टेशन करण्याकरिता प्रत्येक गाळ्यांचे 15 हजार रुपये असे एकूण 30 हजार रुपयांची मागणी होती. तडजोडीअंती ही रक्कम 20 हजार ठरविण्यात आली.

म्हणून तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आज सायंकाळी पालघर लाचलुचपत विभागाने सापळा रचून लाचेची 20 हजारांची रक्कम घेताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. 
ही कारवाई पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक के. एस. हेगाजे, पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, पोलिस हवालदार मांजरेकर, कदम, पोलिस नाईक सुवारे यांच्या पथकाने केली. रात्री उशिरापर्यंत तपासकार्य सुरू होते. 

registrar was caught red handed taking bribes in vada

( संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT