kulaba foert sakal
मुंबई

कुलाबा किल्ल्याचा समर्पक इतिहास पर्यटकांपर्यंत पोहचणार!

२२ तरुणांची मार्गदर्शक म्हणून निवड; पर्यटनवाढीसाठी प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : येथील कुलाबा किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांना या किल्ल्यांची विश्‍वसनीय माहिती सहज आणि सोप्या भाषेत मिळणार आहे. पुरातत्व संशोधन विभागाने यासाठी २२ (गाईड) मार्गदर्शकांचे पथक तयार केले आहे.

मागील वर्षी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुरातत्त्व संशोधन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या किल्ल्याची पाहणी केली होती. या ठिकाणी ऐतिहासिक वास्तूंना कोणताही धोका न पोहोचवता रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याची पाहणी करण्याचे आदेश अदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. पर्यटनवाढीबरोबर तरुणांना रोजगार मिळावा म्हणून पुरातत्त्व संशोधन विभाग आणि बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून २२ तरुणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या मार्गदर्शकांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

कुलाबा किल्ल्यात उजव्या सोंडेचा पंचायतन गणपती मंदिर, हनुमान मंदिर, शिवमंदिर, दर्गा, तोफा, गोड्या पाण्याची विहीर, दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण, सर्जेकोट किल्ला यासह अनेक वास्तू या ठिकाणी अद्याप शाबूत आहेत; मात्र या वास्तूंचे नाव, त्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहचत नाही.

सागरी आरमारातील महत्त्व

अरबी समुद्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी मुंबईचे इंग्रज, कोर्लईचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी यांच्यात वारंवार लढाया होत असत. यांच्यावर मराठ्यांचा धाक असावा म्हणून कुलाबा किल्ल्यात मराठा सागरी आरमाराचे मुख्यालय करण्यात आलेले होते. या सागरी आरमाराची जबाबदारी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याकडे देण्यात आलेली होती, ती त्यांनी बजावत अरबी समुद्रावरील वर्चस्व कायम ठेवले. हा प्रेरणादायी इतिहास आहे. त्यामुळे तो सर्वसामान्यांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न २२ गाईड यांच्या माध्यमातून पुरातत्त्व संशोधन विभागाने केला आहे. तो यशस्वी ठरेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

निवड करण्यात आलेल्या मार्गदर्शकांना कुलाबा किल्ल्याबद्दल आतापर्यंतच्या लिखित पुस्तकातील माहितीपेक्षा जास्त सखोल माहिती देण्यात आलेली आहे. या माहितीतून आपण समृद्ध इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी आल्याची जाणीव पर्यटकांना होईल.

- रघुजी आंग्रे, आंग्रेंचे वंशज

रायगडमध्ये समृद्ध इतिहास दडलेला आहे. याची माहिती पर्यटकांना शैक्षणिक सहलीनिमित्ताने येणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाली तर यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्याआणखी वाढेल.

- अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT