reliance Industries invested usd 150 bn in last 10 years mukesh ambani Sakal
मुंबई

Reliance AGM 2023: : रिलायन्स इंडस्ट्रीज ने दहा वर्षात दीडशे अब्ज डॉलर गुंतवले

रिलायन्सच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास चार लाखांच्या आसपास आली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज ने गेल्या दहा वर्षात एकंदरीत दीडशे अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतातील कोणत्याही कंपनीने आतापर्यंत केली नाही, अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

या काळात कंपनीने आपल्या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये अडीच लाखांपेक्षाही जास्त नवी रोजगार निर्मिती केली आहे. आता रिलायन्सच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास चार लाखांच्या आसपास आली आहे. त्याचप्रमाणे रिलायन्सने त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात मोठ्या संख्येने अप्रत्यक्ष रोजगार दिले आहेत असेही ते म्हणाले.

रिलायन्स हा नव्या भारताच्या निर्मितीतील महत्वाचा भागीदार असून आम्ही आमच्यापुढे मोठी लक्ष ठेवली आहेत. मात्र आम्ही ती साध्य करणारच, असेही ते म्हणाले. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात रिलायन्सला सुमारे पावणेदहा लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्याद्वारे कंपनीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीतही मोठी भर घातली आहे. तर गेल्या वर्षात कंपनीला ७३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा मिळाला असेही त्यांनी दाखवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT