mumbai Sakal
मुंबई

मुंबई : रिलायन्सचे पहिले बहुद्देशीय मोबिलिटी स्टेशन नावडे येथे सुरू

इंधन, इलेक्ट्रिक चार्जिंग आदी अनेक सेवा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रिलायन्स (Reliance) बीपी मोबिलिटी सर्व्हिसेस (Mobility Services) तर्फे आज नवी मुंबईतील नावडे येथे ऍक्टिव्ह पद्धतीचे इंधन, इलेक्ट्रिक चार्जिंग, ऑईल बदल सेवा, रिटेल शॉपिंग अशा अनेक सेवा एकत्र देणारे पहिले मोबिलिटी स्टेशन (Mobility station) सुरु करण्यात आले.

रिलायन्सच्या देशभरातील चौदाशे पेट्रोल पंपांचे रुपांतरही येत्या काही महिन्यांमध्ये अशाच जिओ बीपी मोबिलिटी सेंटरमध्ये केले जाणार आहे. या सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंधने, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग, रिलायन्स रिटेल स्टोअर, उपहारगृह आदी सर्व सुविधा असतील.

येथे ऍक्टिव्ह तंत्रज्ञानाचे विशेष इंधन नेहमीच्याच दरात पुरवले जाईल. या इंधनामुळे वाहनांच्या इंजिनातील महत्वाच्या भागांवर विशेष वंगणाचा थर जमतो व त्यामुळे इंजिन स्वच्छ राहते, असा रिलायन्सचा दावा आहे. येथे इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग होईल तसेच त्यांच्या चार्जिंग संपलेल्या बॅटरी बदलून त्याऐवजी चार्जिंग केलेल्या बॅटरीही दिल्या जातील. येथे दुचाकी वाहनांची तपासणी होईल तसेच त्यांचे इंजिन ऑईलही कॅस्ट्रॉलच्या सहकार्याने निःशुल्क बदलून दिले जाईल. यापुढे अशा केंद्रांमध्ये स्वच्छ म्हणजेच प्रदूषण कमी करणाऱ्या इंधनाचे वेगवेगळे पर्यायही दिले जातील.

येथे वाईल्ड बीन कॅफेची उपहारगृह सेवाही मिळेल. त्यात त्यांच्या जगप्रसिद्ध कॉफीसह मसाला चाय, सामोसा, उपमा, पनीर टिक्का रोल, चॉकलेट लाव्हाकेक आदी खाद्यपदार्थही मिळतील. स्वच्छ इंधन तसेच इलेक्ट्रिंग चार्जिंग सुविधा पुरविण्यात देशभरात आघाडी घेण्याचे जिओबीपी चे लक्ष्य आहे. या सर्व ठिकाणी डिजिटल पेमेंटसह भरपूर डिस्काऊंट उपलब्ध होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT