मुंबई

पर्यटन सुरळीत होईल तेव्हाच पालघरमधील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा!

संदीप पंडित

विरार : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुकारलेला लॉकडाऊन, त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणारी हॉटेल आणि रिसॉर्ट उद्यापासून (सोमवार) सुरू होणार आहेत. त्यामुळे आर्थिक गणित बिघडलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळणार असला तरी पालघर जिल्ह्यातील हॉटेल आणि रिसॉर्ट मालकांना पर्यटकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सरकारने पर्यटन आणि तीर्थस्थळांबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही.पालघर जिल्ह्यातील पर्यटन-तीर्थस्थळे सुरू केल्यानंतरच हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये ग्राहक वाढतील. त्यामुळे सरकारपर्यटनस्थळांबाबत कधी निर्णय घेणार, याकडे पालघरमधील हॉटेल-रेस्टॉरंट चालकांचे लक्ष लागले आहे.
 
पालघर जिल्ह्याची पश्‍चिम किनारपट्टी ही ‘मिनी गोवा’ म्हणून ओळखली जाते. स्वच्छ किनारे, प्रसिद्ध किल्ले, निसर्गरम्य वातावरण, पावसाळ्यात वाहणारे धबधबे आणि तीर्थस्थळे पर्यटकांना आकर्षित करतात; परंतु कोरोना महामारीमुळे पर्यटनावर आधारित हॉटेल, रिसॉर्ट आणि त्यावर आधारित इतर व्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प होते.

राज्य सरकारने सोमवारपासून हॉटेल आणि रिसॉर्ट सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी जोपर्यंत येथील प्रसिद्ध देवस्थाने आणि किनारे पूर्ण क्षमतेने सुरू होत नाहीत, तोपर्यंत हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये ग्राहकच येणार नसल्याचे व्यावसायिक सांगतात.  


कोरोनामुळे गेले सहा महिने हॉटेल आणि रिसॉर्टचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने हे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली तरी आम्हाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पर्यटनाला परवानगी दिल्यानंतरच आमचा आर्थिक गाडा रुळावर येईल. 
- धीरज निजाई, हॉटेल व्यवसायिक, शीतल समुद्र

हॉटेल सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी जोपर्यंत पर्यटन स्थळे, देवस्थाने सुरू होत नाहीत, तो पर्यंत हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस येणार नाहीत. काहीही असले तरी यापुढे हॉटेल मालक आणि पर्यटक, नागरिक यांना आपली काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. 
- अवी कुसे, हॉटेल समाधान, वसई

-------------------
(संपादन : प्रणीत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

भोगवटा दाखल्यासाठी आमदाराची पैशांची मागणी? महापौरांच्या पतीने फ्लॅट मागितल्याचा दावा

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

Rahul Gandhi: 'देशातील काही राज्यात वारंवार भाजपचीच सत्ता का येतेय?'

SCROLL FOR NEXT