मुंबई

वाह! कॉलेजचे शुल्क हप्त्याने देण्याची सुविधा मिळणार? वाचा सविस्तर बातमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना महामारीमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे, त्यामुळे महाविद्यालयाच्या शुल्कात वाढ करु नका. त्याचबरोबर सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना हप्त्यांवर शुल्क भरण्याची सुविधा देण्यास मुंबई विद्यापीठाने सांगितले. आगामी 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी शुल्कात वाढ करु नका, असे पत्र मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना पाठवले आहे. विद्यापीठाने अनुदान आयोगाने याबाबत सूचना केली आहे, तसेच शैक्षणिक वर्ष सुरु होताना शुल्क भरण्याची सक्तीही करु नका, असेही सांगितले आहे. 

देशभरात 25 मार्चपासून लॉकडाऊन आहे. त्याचा आर्थिक फटका सर्व उद्योग तसेच अस्थापनांना बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नोकरींचा प्रश्न निर्माण झाला आहे. खाजगी अस्थापनात काम करणाऱ्यांवरही त्याचा प्रतिकुल परिणाम झाला आहे. हे सर्व लक्षात घेऊन शैक्षणिक शुल्कात वाढ करु नये, असे सर्व महाविद्यालयांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हंटले आहे. सध्या महाविद्यालयात असलेल्या तसेच नव्याने प्रवेश घेणाऱ्या शैक्षणिक शुल्क हप्त्याने भरण्याची सुविधा देण्यात यावी. याची अंमलबजावणी स्वायत्तसह सर्व महाविद्यालयांनाही करणे आवश्यक आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रात म्हंटले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने पाठवलेले पत्र तसेच लॉकडाऊन लक्षात घेऊन आम्ही महाविद्यालयांना शुल्क न वाढवण्याची सूचना केली आहे तसेच त्यांना हप्त्याने शुल्क देण्याची सुविधाही दिली आहे, असे मुंबई विद्यापीठाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

Satara News: साताऱ्यात मृतदेहांची अदलाबदल;एकाच स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार,हलगर्जीप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित!

Chhatrapati Sambhajinagar: ‘मार्च एंड’ला रात्री बिलांचा पाऊस; कोषागार कार्यालयात कधी नव्हे एवढी लगबग; कोट्यवधी रुपये केले अदा

SCROLL FOR NEXT