police  
मुंबई

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...! सामाजिक भान राखून अखेर पोलिसांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

नालासोपारा : महामार्गावरील खड्ड्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वर्दीतील महामार्ग पोलिसांनीच हातात फावडे आणि घमेले घेऊन सोमवारी  महामार्गावरील खड्डे बुजवले. 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत मालजीपाडा येथे ओहरब्रिजचे काम सुरू आहे. त्यामुळे तीन लेनची वाहतूक ही एका लेनवरून सुरू आहे. ज्या लेनवर वाहतूक सुरू आहे. त्या लेनवर सुद्धा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे गुजरातहून मुंबई आणि मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या दोन्ही दिशांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत महामार्ग पोलिसांनी आयआरबीला वारंवार सांगून सुद्धा त्यांच्याकडून रस्त्याची डागडुजी होत नसल्यामुळे वाहनधारक आणि महामार्ग वाहतूक पोलिसांवर याचा प्रचंड ताण पडत आहे. 

खड्डे पडलेले असल्याने सोमवारी पुन्हा सकाळपासूनच महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुंबईच्या दिशेने जाणारे वाहन धीम्या गतीने सुरू होती. शेवटी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी चिंचोटी महामार्ग केंद्राचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र वडे यांच्या पुढाकारातून पोलिस नाईक शिवराज झांजुरने, अविनाश पानसरे, बाळासाहेब वने, बंडू पाटील, पोलिस हवालदार सुनील भालेराव या वर्दीतल्या पोलिसांनीच हातात फावडे आणि घमेले घेऊन महामार्गावरील खड्डे बुजवून आपली सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक सुरळीत केली आहे..

आयआरबीच्या निष्काळजीपणाचा फटका रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहून काम करणाऱ्या पोलिस आणि प्रवासी वाहनधारकांना बसत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

(संपादन : वैभव गाटे)

repair potholes by mumbai traffic police on mumbai ahamadabad road 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘हेरा फेरी’चा हिरो आता बिझनेसमन! सुनील शेट्टीने जावई आणि ल्योकासोबत उभारला नवीन व्यवसाय, महिलांसाठी खास वस्तू आणली बाजारात

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

ICCपेक्षा BCCIकडून जास्त बक्षीस! भारतीय महिला संघासह सपोर्ट स्टाफ होणार मालामाल

DCB Bank Job : जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य, राज्य शासनाचा निर्णय; सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

SCROLL FOR NEXT