BMC sakal media
मुंबई

झाडे जगण्याचे प्रमाण देशात 80% ; महापालिकेत मात्र 54 टक्के; 'CAG'चा ठपका

समीर सुर्वे

मुंबई : पुनर्रोपित केलेली झाडे (re plantation) जगण्याचे प्रमाण (tree life) देशात 80 टक्के आहे. मात्र, देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत (bmc) हे प्रमाण अवघे 54 टक्के आहे. असा ठपका देशाचे प्रमुख लेखापरीक्षक (CAG) ठेवला आहे. झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी शास्त्रोक्त पध्दत वापरली जात नसल्याची शंका व्यक्त करत त्याबाबत कॅगने महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून माहिती मागवली आहे. पालिकेने नियुक्त केलेल्या एकाही ठेकेदाराकडे (contractor) यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रसामुग्री (machinery) उपलब्ध नसल्याचेही कॅगने नमुद केले आहे.

मुंबईतील प्रकल्पांना अडथळा ठरणारी झाडे कापण्या बरोबरच पुनर्रोपित केली जातात.मात्र,पुनर्रोपित केलेल्या झाडांची माहिती आता पर्यंत प्रसिध्द झालेली नव्हती.पर्यावरण प्रेमींकडून नेहमीच पुनर्रोपणावर आक्षेप घेतला जात होता.झाडे वाचविण्यासाठी पुनर्रोपणावर भर दिला जात असल्याचा दावा महानगर पालिकेकडून केला जात होता.मात्र,आता पहिल्यांदाच पालिकेकडून केले जात असलेले पुनर्रोपण फक्त दिखावा असल्याचे उघड झाले आहे.

कॅगने 2016 ते 2020 या काळातील पालिकेकडून उपलब्ध करुन दिलेल्या माहितीच्या आधारे विश्‍लेषण करुन पुनर्रोपणावर प्रश्‍न उपस्थीत केले आहे.मुंबईत 3 हजार 735 झाडांचे पुनर्रोपण झाले.त्यातील 2004 झाडे वाचली असल्याचे कॅगने आपल्या अहवालत नमुद केले आहे. झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी शास्त्रोक्त पध्दतीचा वापर करणे गरजेचे आहे.पुनर्रोपित झाड मरु नये म्हणून ते स्थालांतर करताना मुळापासून काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी विविध यंत्रसामुग्री वापरणेही गरजेचे आहे.मात्र,पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडे अशी यंत्रसमुग्री नसल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

वांद्रे,सांताक्रुझ मध्ये सर्वात कमी प्रमाण

कॅगने पालिकेच्या झोननुसार पुनर्रोपित केलेली झाडे जगण्याचा अभ्यास केला आहे.यात,झोन तीन मध्ये म्हणजे वांद्रे,खार,सांताक्रुझ तसेच अंधेरी जागेश्‍वरी पुर्व या भागत हे प्रमाण फक्त 41 टक्के आहे.हे मुंबईतील सर्वात कमी प्रमाण आहे.या झोन मध्ये 460 झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले.त्यातील 189 झाडे जगली.

पुनर्रोपित करुन जगलेली झाडे

-झोन - पुनर्रोपित केलेली झाडे - जगलेली झाडे - टक्के

-कुलाबा ते भायखळा (झोन 1)-188-130---69

-लालबाग,वरळी ते धारावी,माटूंगा (झोन 2)-536--343--64

-वांद्रे,खार,सांताक्रुझ,अंधेरी जोगेश्‍वरी पुर्व (झोन 3)-460---189---41

-अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम,मालाड,गोरेगाव (झोन 4)-441---319---72

-कुर्ला,चेंबूर,गोवंडी, मानखुर्द (झोन 5)-591---315----53

-घाटकोपर ते मुलूंड (झोन 6)-1104---509---46

-बोरीवली,कांदिवली,दहिसर (झोन 7)-415--199---48

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT