Mumbai news  
मुंबई

Mumbai : देवस्थानांवर महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार व्हावा; उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या सूचना

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विविध देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. विशेषत: पंढरपूर, एकविरा देवी, तुळजापूर, अष्टविनायक अशा देवस्थानांमध्ये महिला भाविकांसाठी पायाभूत सुविधा करण्याची आवश्यकता नेहमीच भासते. या पार्श्वभूमीवर देवस्थानांच्या विश्वस्त समितीमध्ये योग्य प्रमाणात महिलांचा समावेश असावा याचा विचार व्हावा अशी सूचना आज विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी धर्मादाय आयुक्तांना केली.

विधान भवनात जेजुरी देवस्थानच्या विषयावर विनंती अर्ज समितीच्या वतीने एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यापूर्वी १३ जून २०२३ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीचा पाठपुरावा म्हणून आज विधान भवनात बैठक झाली.

यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे जेजुरी देवस्थानबाबत एक अहवाल सादर करण्यात आला. मंदिराच्या आवारातील दुरुस्ती, डागडुजी कामे याबाबत पुरातत्व खात्याकडून माहिती सादर करण्यात आली. जेजुरी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून भाविकांकडून घेण्यात येणाऱ्या दर्शन पासच्या व्यवस्थेबाबत यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी विचारणा केली.

मंदिरातील सोने वितळविण्याच्या प्रक्रियेची धर्मादाय आयुक्त कार्यालयाला नियमित स्वरूपात देण्यात याव्यात. मंदिराच्या संदर्भात असलेल्या विविध कामांबाबत निविदा या स्थानिक पण लोकप्रिय वर्तमानपत्रात देण्यात याव्यात. गेल्या काही वर्षातील झालेल्या बैठकांच्या कागदपत्रांची तपासणी धर्मादाय आयुक्तांनी करावी. मंदिरात लावण्यात आलेल्या मेटल डिटेक्टरची नियमित देखभाल करून ते सुधारित स्वरूपात लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जेजुरीमधील चिंचेची बाग परिसरात भाविकांकडून होत असलेल्या विविध विधींबाबत एक नियमावली करा. मंदिर परिसरात भाविकांकडून उधळण्यात येणाऱ्या भंडारा (हळद) आयुर्वेदिक असली पाहिजे असा आग्रह धरतानाच त्यांनी आता वापरण्यात येणाऱ्या हळदीच्या नमुन्यांची चौकशी अन्न व औषध प्रशासनाकडून करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT