मुंबई

रिपब्लिक टीव्हीच्या वार्तांकनाने न्यायालयाचा अवमान? संस्थेला कायदेशीर नोटीस

- सुनीता महामुणकर

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यावर रिपब्लिक टीव्हीवर केलेल्या आक्षेपार्ह वार्तांकनामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, असा आरोप करणारी कायदेशीर नोटीस एका वकिलाने रिपब्लिकला पाठवली आहे.

उच्च न्यायालयाने दिलेला जामीन नाकारण्याचा निकाल हा या प्रकरणाच्या गुणवत्तेवर आधारित होता. मात्र या निकालाचे वार्तांकन करताना त्याला राजकीय रंग देण्यात आला, असे या नोटीसीमध्ये म्हटले आहे. उच्च न्यायालयात वकिली करणारे एड सैफ आलम यांनी रिपब्लिक मिडिया नेटवर्कलाही नोटीस बजावली आहे. 
उच्च न्यायालयातील सुनावणी आणि निकाल हा गोस्वामी यांच्या विरोधातील कारस्थान आहे, असे विधान एंकरने केले होते. तसेच गोस्वामी यांना कारागृहात टाकण्याच्या कारवाईत न्यायालय सहभागी होते, अशा स्वरूपाची विधाने करण्यात आली होती. याबाबत संबंधित व्रुत्तवाहिनीने त्यांच्या चैनलवरच जाहीर माफी मागावी, अशी मागणी आलम यांनी नोटीसीमध्ये केली आहे.

न्यायालयाचा निकाल नकारात्मक पद्धतीने आणि चुकिच्या प्रकारे व्यक्त करून जनमानसात न्यायालयाची आणि न्यायमूर्तींची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केले, त्यामुळे संबंधित चैनलने माफी मागावी अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करु, असा इशारा दिला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सात दिवस गोस्वामी अलिबाग पोलिसांच्या कोठडीत होते.

Republic TV coverage of contempt of court? Legal notice to the organization

=--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT