Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte sakal
मुंबई

Gunratna Sadavarte : सदावर्तेंच्या संतप्त वक्तव्यांमूळे मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजिनामे

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत रविवारी आयोजीत करण्यात आलेल्या हिंदु जनआक्रोश मोर्चात सहभागी झालेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुस्लिम धर्मांच्या सुफी संताबद्दल तिव्र भाषेचा वापर करून संतापजनक वक्तव्य केले आहे.

मुंबई - मुंबईत रविवारी आयोजीत करण्यात आलेल्या हिंदु जनआक्रोश मोर्चात सहभागी झालेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुस्लिम धर्मांच्या सुफी संताबद्दल तिव्र भाषेचा वापर करून संतापजनक वक्तव्य केले आहे. त्यामूळे एसटी संप काळात अत्यंत खंदे समर्थक मानले जाणारे कष्टकरी जनसंघाचे सरचिटणीस मं.ताजोद्दीन यांनी आपल्या पदाचा सोमवारी राजीनामा दिला आहे. सदावर्ते यांच्या वक्तव्यामूळे त्यांच्यासह राज्यातील इतरही मुस्लिम नागरिकांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मं.ताजोद्दीन यांनी सोमवारी एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष आणि सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या नावे राजीनामा पाठवला आहे. अॅड.सदावर्ते यांनी मुस्लिम धर्माचे हजरत टिपू सुलतान रहेमतुल्ला अलैय व हिंदल वली खाजा गरीब नवाज चीशती रहेमतुल्ला अलैय या सुफी संताच्या विरोधात तिव्र शब्दात माध्यमांसमोर वक्तव्य केल्याचा आरोप राजिनामा पत्रात करण्यात आला आहे. ज्यामूळे राज्यातील मुस्लिमांचे आणि एसटी कष्टकरी जनसंघाच्या मुस्लिम सभासदांचे आणि पदाधिकाऱ्यांसह आपल्या भावना दुखावल्याचेही मं.ताजुद्दीन यांनी सांगितले असून, मं.ताजोद्दीन यांचा राजीनामा समाजमाध्यमांवर सुद्धा झपाट्याने व्हायरल होत आहे.

एसटी कष्टकरी जनसंघात कोणीही कुठल्याही जातीयतेवर बोलत नाही. सर्व जाती धर्मतील कष्टकऱ्यांची फक्त एकच जात म्हणजे कष्टकरी असल्याचे सदावर्ते नेहमी सांगतात, मात्र, दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या सुफी संताबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जाते. हे योग्य नसुन, त्यांच्या वक्तव्याबद्दल सदावर्ते यांना विचारणा केल्यानंतरही त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळाले नाही. त्यामूळे व्यथीत होऊन राजिनामा देत असल्याचे मं.ताजुद्दीने यांनी सांगितले आहे. याबद्दल अॅड.सदावर्ते यांनी प्रतिक्रीया देण्यास टाळले आहे.

जनसंघाची ताकद वाढावी म्हणून राज्यभर चांगल्या प्रकारे काम करत होतो परंतु रविवारी सदावर्ते यांनी माध्यमांवर हजरत टिपू सुलतान व तसेच खाजा गरीब नवाज रहमतुल्ला अलय यांचा विरोधात अक्षेपार्य वक्तव्य केल्यामुळे माझे व राज्यातील सर्व एस टी कष्टकरी जनसंघाच्या सर्व मुस्लिम सभासदांची भावना दुखवल्यामुळे राजीनामा दिला आहे.

- मं.ताजोद्दीन मं.मुनिरोद्दीन, सरचिटणीस, एसटी कष्टकरी जनसंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT