मुंबई

एकत्र बसून औरंगाबादचा मुद्दा निकाली काढू; संजय राऊतांचे विरोधकांना उत्तर

समीर सुर्वे


मुंबई :औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत मतभेदाचा विषय नाही.एकत्र बसले,तर मुद्दा निकाली निघेल. शिवसेनेची भुमिका कायम आहे. असे नमुद करत पाच वर्ष भाजपची सत्ता होती.तेव्हा का हे सुचले नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत शिवसेना आणि कॉंग्रेस मध्ये वादाची ठिणगी पडली आहे.त्यावर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले,"महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या नेत्यांना औरंगजेबा पेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर श्रध्दा आहे आणि असायलाच हवी.जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसाच औरंगजेबही नाही.औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी 30 वर्षांपुर्वी केले आहे.आता फक्त कागदावरच बदलायचं आहे.असेही त्यांनी सांगितले.एका शहराच्या नावावरुन मतभेद वैगरे नसतात.असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे मुख्यमंत्री सामाना मधिल भाषे बद्दल संपादिका रश्‍मी ठाकरे यांना पत्र लिहीणार असल्याचे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.त्यावर पत्रकारांनी विचाले असता"आता ते पत्र लिहीणार म्हणजे मी घाबरलो'अशा मिश्‍कील शैलीत उत्तर देत राऊत पुढे म्हणाले," ते आता सामना वाचायला लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे.कालपर्यंत ते सामना वाचत नव्हते.आता त्यांच्या जीवनात भरपुर बदल होतील.सामना वाचत राहीले तर त्यांचा विश्‍वास बसेल हे सरकार पुढील पाच वर्ष टिकेल.असा चिमटाही त्यांनी काढला.

resolve the issue of renaming Aurangabad from the discussion sanjay raut

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi TMC Post : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता...'; राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

SCROLL FOR NEXT