anil parab resort 
मुंबई

अनिल परबांचं रिसॉर्ट पाडा... केंद्राचे आदेश जारी

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील शिवसेना नेत्यांच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलींद नार्वेकर यांच्या फार्महाऊसवर कारवाई करण्यात आली होती. पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांचं कोकणातील फार्महाऊस जमीनदोस्त करण्यात आलं. आता अनिल परब यांचे रिसॉर्ट्स पाडण्याचा आदेश भारत सरकारने दिला आहे. (Anil parab resort)

महाराष्ट्र कोस्टल झोन अथॉरिटीने यासंबंधी माहिती दिल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितलंय. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं असून 'अनिल परब का रिसॉर्ट तुटेगा' असं त्यांनी म्हटलंय.

अनिल परब यांच्यावर पर्यावरण कायदा कलम 15 आणि 19 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अनिल परब यांनी काही जणांशी संगनमत करुन कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता 'सीआरझेड'चे उल्लंघन करून बनावटी कागदपत्रे आणि आवश्यक पुरावे तयार केले. यानंतर दापोलीत 22 डिलक्स खोल्यांचं 4 स्टार रिसॉर्ट बांधण्यात आलं. यासाठी 10 कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती सोमय्यांनी दिली होती.

कोरोना काळात रत्नागिरीतील दापोलीत समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत 4 स्टार रिसॉर्ट बांधण्यात आलं. १७ हजार ८०० स्क्वेअरफूट जागेत त्याची उभारणी झाली आहे. आजच्या किंंमतीत त्याचं बाजारमूल्य २५ कोटी रुपये आहे. आता ते रिसॉर्ट पाडण्याचा आदेश मोदी सरकारने आज दिला आहे. १७ डिसेंबर रोजी नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर ३१ जानेवारीला महाराष्ट्र कोस्टल झोन अथॉरिटीने यासंबंधी नवी सूचना जाहीर केलीयं, अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली.

रिसॉर्ट ताबडतोब पाडा

सीआरझेड हे नो डेव्हलपमेंट झोनमध्ये आहे. यामुळे ते ताबडतोब पाडण्यात यावं, पूर्वासारखी जमीन करावी. असा आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिला आहे,असं सोमय्यांनी म्हटलंय.

किरीट सोमय्यांचं ट्वीट

मिलिंद नार्वेकरचा बंगलो तुटला, अनिल परब का रिसॉर्ट टुटेगा

केंद्राच्या पथकाकडून पाहाणी

रत्नागिरीतील दापोलीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर हे रिसॉर्ट बांधण्यात आलंय. मागील वर्षभरापासून हा विषय वादाच्या भोवऱ्यात आहे. कारण रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचं हे रिसॉर्ट आहे. ते बेकायदेशीरपणे बांधले असल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी या रिसॉर्टची पाहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झालं होतं. त्यानंतर आता कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT