मुंबई

वसई-विरार, नालासोपारा परिसरात प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद! तब्बल इतक्या सार्वजनिक मंडळांना रद्द केला गणेशोत्सव

विजय गायकवाड

नालासोपारा :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने परिपत्रकाद्वारे यंदाच्या गणेशोत्सवाबाबत नियमावली घालून दिली आहे. या नियमावलीचे काटेकोर पालन करावे यासाठी वसई ताल्युक्यातील 7 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत विविध गणेश मंडळ सोबत बैठका घेऊन, गणेश मंडळांना मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. पोलिसांच्या या सूचना व अहवानाला साथ देत वसई ताल्युक्यातील 736 सार्वजनिक गणेश मंडळांपैकी 181 गणेश मंडळांनी स्वस्फूर्तीने यंदाचा गणेशोत्सव रद्द केला असून, 53 मंडळांनी सार्वजनिक गणेश उत्सवाचे रूपांतर घरगुती गणपतीमध्ये केले आहे.  तर 555 गणेशोत्सव मंडळ सोशल डिस्टन्सचा राखून अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार असल्याची माहिती वसई चे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी  'सकाळ' शी बोलताना दिली आहे. 

यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकरी गेल्या आहेत. अनेकांवर आर्थिक संकट आहे. त्यामुळे आज गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण वसई विरार नालासोपाऱ्यात रस्ते, भाजारपेठ, कालाकेंद्र, सर्वच ठिकाणी निरुत्साह आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कांत सागर यांनी गणेश मंडळांना अहवान करून, यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, शक्य झाले तर रद्द करावा आणि त्याचा शिल्लक निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून द्यावा  असे अवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर याची सुरूवात त्यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यातील गणेशोत्सव रद्द करू केली आणि त्यातील जमा झालेल्या निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे सांगितले आहे. 

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 7 पोलीस ठाण्याचे प्रभारी, 3 उपायुक्त, पोलीस कर्मचारी, दंगलनियंत्रण पथक, राज्य राखीव दल, स्पेशल ट्रेकिंग फोर्स वसई ताल्युक्यात तैनात केला आहे. गणेशाचे विसर्जनाच्या ठिकाणी कोणतीही गडबड, गोंधळ होणार नाही, गर्दी जमणार नाही, याची दक्षताही घेण्यात येणार आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन् मंत्री आलमगीर आलम यांना अटक; सचिवाच्या नोकराकडे सापडले होते ३७ कोटी

Latest Marathi News Live Update : पंतप्रधानांच्या रोड शोला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

Jintur Crime : चाकूने भोसकून गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; दोन अटकेत, जिंतूर शहरातील घटना

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानला दुसरा धक्का! जैस्वाल पाठोपाठ संजू सॅमसनही स्वस्तात बाद

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

SCROLL FOR NEXT