मुंबई

निर्बंध शिथील झाली... दुकाने ऊघडली, पण फॅशन स्ट्रीट सुना-सुनाच...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः मुंबईतील अनेक दुकाने ऊघडण्यास सुरुवात झाली आहे, पण मुंबईची, विशेषतः दक्षिण मुंबईची ओळख असलेला फॅशन स्ट्रीट अद्याप खुला झालेला नाही. लॉकडाऊननंतर काही दुकाने ऊघडण्यास परवानगी मिळाली, पण अद्याप फॅशन स्ट्रीट खुला करण्यास मंजूरी मिळालेली नाही.

मुंबई अनलॉक करण्यास सुरुवात झाली. काही नियम आणि अटींसह 5 जूनपासून मुंबईतील काही दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे, पण फॅशन स्ट्रीट सुरु करण्यास अद्याप मान्यता न मिळाल्याचे सांगण्यात येते. कमी किंमतीत येथे कपडे मिळता, त्यापेक्षा एखादे कसलेले गिऱ्हाईक सांगितलेल्या दरापेक्षा खूपच कमी किंमतीत कपडे खरेदी करतात. त्यामुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो. येथे मुंबईच्या उपनगरातीलच नव्हे तर परदेशातून येणारे पर्यटकही खरेदीसाठी येत असत. मात्र सध्या हा भाग सुनासुना आहे.

मुंबईतील दुकाने 5 जूनपासून खुली होणार हे कळल्यामुळे येथील दुकानदार खूष झाले होते. त्यातील अनेकांनी त्यापूर्वी येऊन आपली दुकाने स्वच्छ केली. रस्त्याबाहेर प्लॅस्टीक लावण्याची व्यवस्था केली. दुकानाबाहेर लावलेले कपडे पावसात भिजू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली, पण येथील दुकाने खुली होण्यास मंजूरी मिळाली नाही. आता ही दुकाने 15 जूनपासून खुली होतील असे सांगितले जात आहे. 

फॅशन स्ट्रीटवर सध्या चारशेच्या आसपास दुकाने असल्याचे काहींचे म्हणणे आहे. पूर्वी फॅशन स्ट्रीट हा म्युझियमच्या नजिक होता, पण तीस वर्षापासून तो सध्याच्या ठिकाणी आला आहे तसेच दुकानांच्या संख्येतही तीन वर्षात जवळपास तिप्पट वाढ झाली असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक दुकानात किमान शंभर ग्राहक रोज येतात आणि त्यांचे रोज दोनशे ते अडिचशे कपडेही प्रसंगी विकले जात असत. आता हे दिवस पुन्हा कधी येणार याबाबत कोणालाच माहीती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT