मुंबई

मुंबईकरांसाठी खुशखबर! कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय आणि मालमत्ता करांबाबत आली मोठी बातमी; वाचा महापौरांनी काय केले विधान

समीर सुर्वे


मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्ष करण्याचे सुतोवाच आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करु असेही त्यांनी नमुद केले. तर,करदात्यांनाही मालमत्ता करात सुट देण्याचा महापालिकेचा विचार असल्याचे महापौरांनी जाहीर केले.

महापालिका मुख्यालयात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी ही घोषणा केली. महापालिकेची सध्याची आर्थिक परीस्थीतीत तसेच विद्यमान कर्मचाऱ्याचा अनुभवाचा लाभ महापालिकेचा कारभार रुळावर आणण्यासाठी होण्यासाठी हा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमुद केले.कोरोनामुळे बेरोजगारी संकट आले आहे.त्यामुळे अनेक सोसायट्यांना मालमत्ता कर भरणे कठीण झाले आहे. अशा परीस्थीतीत मालमत्ता करात सवलत मिळून देण्याचा प्रयत्न करु असेही महापौरांनी यावेळी नमुद केले.

महानगर पालिकेचे सुमारे 90 हजार ते 1 लाख पुर्णवेळ कर्मचारी असून त्यातील 2 हजाराहून अधिक कर्मचारी दरवर्षी निवृत्ती होतात.हे सर्व कर्मचारी 2002 साला पुर्वी महापालिका सेवेत रुजू झालेले असल्याने त्यांना मासिक निवृत्तीवेतन द्यावे लागतेच.त्याच बरोबर निवृत्तीनंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचे पैसे, ग्रॅज्यूएटी तसेच इतर देणी मिळून किमान 15 ते 20 लाख रुपये महापालिकेला ठराविक कालावधीत द्यावे लागतात.तेवढ्याच प्रमाणात त्यांचा भविष्यनिर्वाह निधी जमा असतो.त्यामुळे महापालिकेने हा विचार करत आहे.महापालिकेने निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवावा लागेल.

महानगर पालिकेचा अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्या जागेवर दुसऱ्या अधिकाऱ्याला बढती दिली जाते.अशा परीस्थीतीत एक एक पद रिक्त होऊन नवी कर्मचारी अधिकाऱ्यांची भरती करावी लागते.हा भारही पालिकेवर वाढतो. 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT