मुंबई

परतीच्या पावसाने भातशेतीला झोडपले; शेतकरी हवालदिल; पीक वाया जाण्याची भीती

अजित शेडगे


माणगाव : खरीप हंगामातील भातशेती कापणीस तयार होत आहे. सध्या कोरोनाच्या संकटात शेतकरी भातशेतीकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत; मात्र परतीचा पाऊस शेतीला झोडपून काढत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

कोरोनाचे सावट, निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसत आहे. जूनपासून सुरू झालेल्या पावसाने भाताची पेरणी, लावणीची कामे वेळेत व लवकर झाली होती. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी 90 दिवसांत तयार होणारी भाताची जात लागवड केली होती. तर काही भातशेती 120 दिवसांत तयार होणारी आहे. मात्र, दररोज हजेरी लावणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाने लोम्बित आलेल्या भातशेतीला झोडपून काढले आहे. उभे असलेले पीक यामुळे जमिनीलगत वाकली आहेत. त्यामुळे लोम्बिंचे नुकसान होत आहे. पाऊस असाच शेतीला झोडपत राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाईल, या चिंतेने शेतकरी असून, भातशेती संकटात सापडली आहे.

भातशेती कापणीस तयार होत आहे. परतीच्या पावसाने उभे पीक आडवे होत आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास पिकाचे नुकसान होईल. कोरोनामुळे रोजगार बंद आहेत. निसर्ग वादळात घरांचे नुकसान झाले आहे. आता परतीच्या पावसाचा तडाखा बसत असून, शेती जमीनदोस्त होत आहे.
- बाळाराम भोनकर,
शेतकरी

वारा, गडगडाटी पावसाने शेतीचे नुकसान होत आहे. लोम्बित आलेला भात झोडपून पडल्याने पळज निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागेल. या वर्षी तिहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.
- संदीप खडतर,
अध्यक्ष, 
आत्मा शेतकरी संघटना, माणगाव

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT