Rice Planting thane  sakal
मुंबई

Rice Planting: मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात यंदा भाताचे विक्रमी उत्पादन

ठाण्यात सर्वाधिक म्हणजेच 57 टक्के वाढ

शर्मिला वाळुंज

ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसामुळे बळीराजा यंदा सुखावला आहे. जिल्ह्यात चालू वर्षी हेक्टरी 44 क्विंटल 27 किलो भाताचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी भाताच्या सरासरी उत्पन्नात 23 टक्क्यांनी वाढ झाली होती.

तर यंदा ही वाढ 35 टक्क्यांनी झाली आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यात सर्वाधिक वाढ ही ठाणे तालुक्यात झाली आहे. भात लागवडीखालील क्षेत्र आणि आणि उत्पन्नात दरवर्षी वाढ होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

ठाणे जिल्हा कृषी अधिक्षक दीपक कुटे यांनी सांगितले, ठाणे जिल्हयात यंदा 53 हजार 742 हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड करण्यात आलेली होती. चालू वर्षी खरीप हंगामात 2682.7 मिमी (107 टक्के) एवढा मुबलक पाऊस झालेला आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये 11 हजार 094.54 मे.टन खताचे वाटप करण्यात आलेले आहे.

संकरित वाणाची 934.42 क्विटल व सुधारित वाणाची 9364.48 क्विटलची विक्री झालेली आहे. सद्यस्थितीत भात पिकाच्या कापण्या पूर्ण झाल्या असून शेतक-यांची मेहनत, सुधारित व संकरित जाती तसेच सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, निसर्गाची साथ, भात पिकावरील किड रोग सर्वेक्षणावरील प्रभावी अंमलबजावणी आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची जोड असल्याने चालू वर्षी भाताच्या उत्पन्नात सरासरीच्या तुलनेत 35 टक्के वाढ झाली असून जिल्हयात विक्रमी असे उत्पादन आलेले आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुटे यांनी दिली.

ठाणे 434.58

कल्याण 4545.24

अंबरनाथ 3149.93

मुरबाड 15188.29

शहापूर 14608

भिवंडी 15816

एकूण 53742.04

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन प्रियंका गांधींचा संताप; म्हणाल्या....

Sachin Vaze: सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका; ५ जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट

Stock Market Crash: 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी स्वाहा! शेअर बाजार का कोसळला?

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

Heart Health: ताजी फळे खाणे की ज्युस पिणे? हृदयाच्या आरोग्यासाठी नक्की काय उत्तम? पाहा संशोधन!

SCROLL FOR NEXT