मुंबई

बॅंक चालवताना संस्कार महत्त्वाचे !

सकाळ वृत्तसेवा



कल्याण : बॅंकिंग क्षेत्रात झालेल्या घोटाळ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बॅंकांवरील विश्‍वास कमी झाला आहे. अशा परिस्थितीत सहकारी बॅंक चालवताना ती चालवणाऱ्यांच्या संस्कारांना विशेष महत्त्व आहे. या संस्कारांवर सहकार क्षेत्रातील बॅंक चालवावी लागते, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले. दि कल्याण जनता सहकारी बॅंकेच्या संचालक समाज सेवा पुरस्कारप्रसंगी बोलताना राज्यपालांनी बॅंकेच्या कामाचे कौतुक केले.


दि. कल्याण जनता सहकारी बॅंकेचा संचालक समाजसेवा पुरस्कार आणि ४६ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रमावेळी ते बोलत होते.  यावेळी बांधकाम व्यावसायिक महेश अग्रवाल, स्टील उद्योगात अग्रेसर असलेले कृष्णलाल धवन तसेच हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. 

ही बातमी वाचा ः  कल्याण-डोंबिवलीचे काही खरे नाही
मुंबईत बॅंकेमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे बॅंकांवरील सर्वसामान्य जनतेचा विश्‍वास कमी झाला आहे; मात्र हा विश्‍वास परत मिळवण्यासाठी बॅंका चालवणाऱ्या संचालकांमध्ये संस्कार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये पुन्हा एकदा बॅंकेबाबत विश्‍वास निर्माण होण्याची आवश्‍यकता असल्याचे राज्यपाल कोश्‍यारी यांनी सांगितले.

भ्रष्टाचार देशाला लागलेली कीड
भ्रष्टाचार देशाच्या मुळांना लागलेली ही कीड आहे. ती दूर करण्यासाठी या सर्वांतून बाहेर पडत लोकांसमोर चांगल्या कामाने उदाहरण ठेवले पाहिजे; ज्यातून काही शिकता येऊ शकेल, असा सल्ला कोश्‍यारी यांनी बॅंकेच्या संचालकांना दिला. सहकार तसेच समाज सुदृढ होईल; ज्याचा समाजासाठी उपयोग होऊ शकेल, असे मतही कोश्‍यारी यांनी या वेळी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT