road construction in two days in rainy season MNS city president Manoj Gharat warned contractor  sakal
मुंबई

Mumbai News : पावसाळ्यात रस्ता दोन दिवसांत नीट करा; मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांचा ठेकेदाराला इशारा

गोग्रासवाडीतील संथगती रस्ते कामाचा नागरिकांना फटका

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - केडीएमसी क्षेत्रात रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणची कामे सुरू असून ती अत्यंत संथगतीने सुरू आहेत. त्यातच पावसास सुरवात झाल्याने ही कामे अनेक ठिकाणी बंद पडली आहेत.

डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात संत नामदेव पथ या वर्दळीच्या रस्त्यावरील सिमेंट काँक्रीटचे काम ‘एमएमआरडीए’च्या ठेकेदाराकडून अतिशय संथगतीने सुरू आहे. या रस्ते कामामुळे नागरिक,

वाहन चालकांना वळसा घालून इच्छित स्थळी जावे लागते. यामध्ये शाळकरी मुलांचे सर्वाधिक हाल होत असून मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी ठेकेदारास जाब विचारत दोन दिवसांत रस्ता सुरू करून देण्याची सूचना केली.

केडीएमसी क्षेत्रात 'एमएमआरडीए' व 'एमएसआरडीसी' अंतर्गत रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणची काम सुरू आहेत.

ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने उन्हाळ्यात याचा फटका नागरिक, शालेय विद्यार्थी, आजूबाजूचे रहिवासी, दुकानदार यांना बसत होता. या कामांवर नियंत्रण ठेवण्याचे कोणतेही अधिकार पालिकेच्या बांधकाम विभागाला नाहीत.

गोग्रासवाडीतील रस्त्याचे एमएमआरडीएच्या वतीने काम करण्यात येत आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली होती.

मात्र पालिका अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांनी याविषयी मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्याकडे या कामाविषयी तक्रार करत नागरिकांची समस्या मांडली. याची दखल घेत शहराध्यक्ष मनोज घरत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

घरत यांनी शुक्रवारी ठेकेदाराला घटनास्थळी बोलावून हे काम योग्यरितीने लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. हे काम वेळेत पूर्ण केले नाही तर मग मनसे स्टाईलने हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा इशारा घरत यांनी दिला.

डोंबिवली शहराच्या विविध भागातून येणारा नागरिक गोग्रासवाडी रस्त्याने एमआयडीसी, पाथर्ली, शेलार नाका, घरडा सर्कल, अभिनव शाळा परिसरात जातो. मानपाडा रस्त्याने येणारा वाहन चालक याच रस्त्याने इच्छित स्थळी जातो.

गोग्रासवाडी रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांबरोबर वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो.

या रस्त्यावरुन शाळेच्या बस येत नसल्याने पालकांना शाळेने सूचना केलेल्या दूरवरच्या बस थांब्यावर जाऊन थांबावे लागते. यासोबतच परिसरातील व्यापारी, ज्येष्ठ नागरिक यांनाही अनेक त्रास सहन करावे लागत असल्याने या रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT