मुकुंद कंपनीनजीक रामनगरपासून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधार पसरला आहे.
मुकुंद कंपनीनजीक रामनगरपासून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधार पसरला आहे. 
मुंबई

दिघ्यामधील रस्ता अंधारात

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुकुंद कंपनीनजीक रामनगरपासून एमआयडीसीला जाण्याकरिता नवीन रस्ता वर्षभरापूर्वी बांधण्यात आला आहे. या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असूनही या ठिकाणी पदपथावर आणि रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत. या ठिकाणी रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याने प्रवाशांना लुटण्याचे प्रकारदेखील सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पथदिवे बसवण्याचा पालिकेला विसर पडला आहे की काय, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत मुकुंद कंपनी ते यादव नगर-रबाळे आणि एमआयडीसीला जोडणारा रामनगर प्रवेशद्वारावरील हा मुख्य रस्ता आहे. रबाळे ते तुर्भे एमआयडीसी रस्त्याचे काम पूर्ण झाले तरी या रस्त्याचे काम मार्गी न लागल्याने अनेक वर्षांपासून हा रस्ता रखडला होता. दीड वर्षापूर्वी या रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्णदेखील करण्यात आले.

दैनंदिन शेकडो वाहनचालक या रस्त्याचा वापर करीत असून, ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास या रस्त्याचा वापर करून ऐरोली, रबाळे, महापे, तुर्भे आणि डोंबिवली-कल्याणकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणूनदेखील या रस्त्याचा वापर करतात; मात्र या प्रशस्त चारपदरी रस्त्याचे काम पूर्ण होऊनदेखील या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत; तर रस्त्याच्या मध्ये बसवण्यात येणाऱ्या मुख्य पथदिव्यांसाठी खोदकाम आणि वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत; मात्र विजेचे खांब मागील वर्षभरापासून बसवण्यात न आल्याने प्रवाशांना या रस्त्यावरून जाताना अंधाराचा सामना करावा लागत आहे. याबाबत कार्यकारी अभियंता संजय देसाई यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

एमआयडीसीतील मोठ्या नामांकित कंपन्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणावर वर्दळ या मार्गावरून सुरू असते; मात्र या ठिकाणी असणारे मुलभूत कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. पालिकेने याकडे लक्ष देऊन तत्काळ सुविधा देण्याची गरज आहे.
- संजय नेहरकर, नागरिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT