Mhada sakal media
मुंबई

आणखी एक हजार कोटींची रस्ते दुरुस्ती; म्हाडा वसाहतीतील रस्त्यांसाठी ३०० कोटी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रस्ते दुरुस्तीसाठी (Road repairing) महापालिकेने (bmc) एक हजार १०० कोटींच्या निविदा (tender) जाहीर केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एक हजार कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यातील ३०० कोटी रुपयांची रस्तेदुरुस्ती म्हाडा वसाहतींमध्ये (mhada society) होणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर दरवेळी रस्ते दुरुस्तीवर हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जातो. त्यानुसार यंदाही महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी निविदा मागवल्या आहेत. १२०० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या निविदेतील अंदाजित खर्चापेक्षा ३० टक्के कमी खर्चाने कामे करण्याची तयारी कंत्राटदारांनी दाखवली होती. त्यावर भाजपने आक्षेप घेतल्यानंतर प्रशासनाने या निविदा रद्द केल्या. त्यामुळे आता फेरनिविदा मागवल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात पालिकेने एक हजार १०० कोटी रुपयांच्या मूल्याच्या निविदा मागविल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १ हजार कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यात ३०० कोटी रुपयांची दुरुस्ती म्हाडा वसाहतीतील रस्त्यांची होणार आहे. राज्य सरकारने २०१८ मध्ये म्हाडा वसाहतीतील नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी म्हाडाला दिली होती. त्यामुळे प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत पेच निर्माण झाला होता. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने पुन्हा प्राथमिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी पुन्हा पालिकेवर सोपवण्यात आली. त्यामुळे पालिकेने आता या भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT