mumbai
mumbai 
मुंबई

भुयार खोदून बँकेवर दरोडा; 27 लॉकर फोडले

सकाळवृत्तसेवा

कोपरखैरणे : जुईनगर सेक्‍टर 11 मधील बॅंक ऑफ बडोदावर आज दरोडा पडला. बॅंकेजवळच्या गाळ्यातून भुयार खोदून दरोडेखोरांनी बॅंकेत प्रवेश करून 27 लॉकर फोडले. यामध्ये सोन्याचे दागिने आणि महत्त्वाच्या दस्ताऐवजांची लूट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जुईनगर सेक्‍टर 11 येथील भक्ती टॉवरमध्ये बॅंक ऑफ बडोदाची शाखा आहे. या बॅंकेपासून जवळच असलेला एक गाळा शशिकांत कोठावळे यांच्याकडून घेसाराम नावाच्या एका व्यक्तीने भाड्याने घेतला होता. त्यामध्ये त्याने श्री बालाजी नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले होते.

दरोडेखोरांनी बॅंकेच्या कामकाजाची माहिती घेऊन या किराणा मालाच्या दुकानातून दरोडेखोरांनी बॅंकेपर्यंत 50 फूट भुयार खोदले. त्यानंतर चोरट्यांनी बॅंकेच्या लॉकररूमपर्यंत पोचत 237 पैकी 27 लॉकर फोडले. या लॉकरमधून ग्राहकांचे सोन्याचे दागिने, दस्तावेज आणि किमती वस्तू पळवल्या.

बॅंकेचा सुरक्षारक्षक सकाळी बॅंकेत आल्यानंतर दरोडा पडल्याचे उघड झाले. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

बॅंकेसमोर तणाव
बॅंकेत दरोडा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर ग्राहकांनी बॅंकेसमोर गर्दी केली. यामुळे बॅंकेबाहेर काही काळासाठी तणावाचे वातावरण होते. सहायक पोलिस आयुक्त किरण पाटील यांनी सांगितले, की दरोड्याच्या तपासासाठी तातडीने 6 पथके तयार केली आहेत. बॅंकेतील लोकर फोडून दरोडेखोरांनी ऐवज लंपास केला असल्याने नेमका मुद्देमाल होता, हे आताच सांगता येणार नाही.

दोन वर्षांत तिसरी घटना
नवी मुंबईत दोन वर्षांत तीन वेळा भुयार खोदून दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना कामोठ्यात एका ज्वेलर्सच्या दुकानाशेजारी भाड्याने गाळा घेऊन भुयार खोदून चोरट्यांनी सोने लुटले होते, तर वाशीत आंबे विक्रीच्या नावाखाली गाळा भाड्याने घेऊन ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याची लूट केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT