मुंबई

Mumbai Crime: दारूमुळे झाला कर्जबाजारी, मग कर्ज फेडण्यासाठी थेट डॉमिनोजमध्ये चोरी

आरोपीला २४ तासांत ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १ : दारूसाठी उधारी आणि त्यातून तीन लाखांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने कामाच्याच ठिकाणी चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला २४ तासांच्या आत गोग्रासवाडी येथून अटक केली. विजय मनतोडे (वय २९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय हा डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात राहण्यास आहे. चिपळूणकर रोडवरील डॉमिनोज पिझ्झा या ठिकाणी तो कामास होता. दारूचे व्यसन असल्याने दारू पिण्यासाठी त्याने अनेकांकडून उधार पैसे घेतले होते.

उधारीचे पैसे परत करावेत, यासाठी त्याच्या दारात दररोज नागरिक उभे रहात असत. काम करत असलेल्या ठिकाणी दिवसाला मोठा गल्ला जमा होतो, हे त्याला समजले होते. त्यामुळे या ठिकाणीच हात साफ करण्याची त्याने योजना आखली होती.

गल्ल्याची बनावट चावी बनवली

काम करत असलेल्या डॉमिनोजमधील गल्ल्याची चावी घेऊन विजयने त्या पद्धतीची बनावट चावी तयार करून घेतली होती. कटावणीच्या सहायाने त्याने दुकानाचे शटर उघडले. दुकानात तिजोरी कोठे आहे हे त्याला माहीत होते.

त्यामुळे तो तडक पहिल्या मजल्यावर गेला. त्या ठिकाणी त्याने चोरी करण्याआधी तेथील सीसीटीव्हीची वायर काढल्याने तो कॅमेऱ्यात कैद झाला नाही. दुकानातील ८० हजाराची रक्कम चोरून तो पसार झाला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Snake in Grapes Farm : शेतकऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला! द्राक्ष वेलीवर वेटोळे घालून बसलेल्या नागाला पाहून काळजाचं पाणी झालं; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ..

Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्ततेनंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; म्हणाले- सत्याचाच विजय झाला

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ४०० कोटींच्या कथित अपहरण प्रकरणात मोठी घडामोड

Satej Patil Hasan Mushrif Vinay Kore Alliance : सतेज पाटील, मुश्रीफ, विनय कोरे एकत्र येणार?, झेडपीतील पाडापाडीमुळे ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी

प्रतीक्षा संपली ! स्टार प्लसचा बहुप्रतीक्षित शो "तारा" १० मार्चपासून रात्री ८ वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

SCROLL FOR NEXT