thief arrested
thief arrested sakal media
मुंबई

कल्याण : रेल्वे परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या दोन महिला चोरट्यांना अटक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकातून (Kalyan Railway station) तपोवन एक्सप्रेस (Tapovan Express) पकडत असताना एका महिला प्रवाशाची पर्स 11 डिसेंबरला चोरीला (Robbery in train) गेली होती. कल्याण रेल्वे पोलीस (kalyan railway police) ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपासात पोलिसांनी चिंचपोकळी येथून रेखा कांबळे व रोजा कांबळे या दोन महिला चोरांना (two woman thief arrested) अटक केली. त्यांच्याकडून 3 गुन्ह्यांची उकल तसेच 4 लाख 27 हजारांचे सोन्याचे दागिने (Gold ornaments seized) पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

उल्हासनगर येथे राहणाऱ्या संगीत डोमाडे या 11 डिसेंबरला 7.15 च्या दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 4 वरील तपोवन एक्सप्रेस गाडीचे बोगीत चढत होत्या. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांची खांद्यावरील पर्स चोरून नेली होती. पर्स मधील 3 लाख 2 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार यांच्या मदतीने 15 डिसेंबर ला चिंचपोकळी रेल्वे स्थानकातून रेखा व रोजा कांबळे यांना ताब्यात घेतले.

तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्हयांतील चोरलेल 3 लाख किंमतीचे सोन्याचे दागिने व इतर दोन गुन्ह्यातील 1 लाख 25 हजार रुओए किमतीचे दागिने असा एकूण 4 लाख 27 हजार रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा लोहमार्गचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक दीपक शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT