who is rohit arya powai children kidnapped

 

esakal

मुंबई

Rohit Arya Children kidnapped : लहान मुलांना डांबून ठेवलं अन् सगळीकडे रॉकेल ओतलं! कोण आहे रोहित आर्य अन् काय होत्या मागण्या?

Children kidnapped in Powai RA studio : तुमचं जरासही चुकीचं पाऊल मला ही संपूर्ण जागा पेटवून देण्यासाठी आणि... असंही या व्हिडिओ म्हटलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Who is Rohit Arya and What were Rohit Arya’s demands? : मुंबईतील पवईत आज एक अतिशय खळबळजनक घटना उघडकीस आली. रोहित आर्य या नावाच्या एका मानिसक रूग्णाने तब्बल १७ मुलांना आणि दोन नागरिकांना एका खोलीत डांबून ठेवलं होतं. एवढंच नाहीतर या व्यक्तीने या सर्वांना पेटवून देण्याचीही धमकी दिली होती.

एका वेबसीरिजच्या ऑडिशनासाठी म्हणून या मुलांना त्याने बोलावून घेतलं होतं. मात्र ऑडिशनला गेलेली मुलं जेवणासाठी बाहेर न आल्याने पालक चिंतीत झाले आणि नंतर मग हा सर्व प्रकार उघडकीस आला. नंतर पोलिसांना याबाबत माहिती कळली गेली आणि पोलिसांनी अग्निशामक विभागाच्या मदतीने त्या व्यक्तीला अटक केली.मात्र तत्पुर्वी या रोहित आर्याने त्याला नेमकं काय हवं आहे, हे एका व्हिडिओद्वारे सांगितलं होतं.

रोहित आर्या नेमकं काय म्हणाला? -

''मी रोहित आर्या, आत्महत्या करण्या ऐवजी मी एक प्लॅन बनवला आणि  काही मुलांना इथे ओलिस ठेवलं आहे. माझ्या फार काही मागण्या नाहीत, फार साध्या मागण्या आहेत. पण माझे काही प्रश्न आहेत. काही जणांशी बोलायचं आहे, पण माझ्या प्रश्नांवर जर त्यांचे काही प्रतिप्रश्न असतील तर मलाही त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. पण मला ही उत्तर हवी आहेत.''

''मला दुसरं काहीच नकोय, मी काही दहशतवादी नाही. माझी कोणतीही पैशांची मागणी नाही, अनैतिक तर अजिबातच नाही. केवळ साधारण बोलणं करायचं आहे आणि त्यासाठी मी या मुलांना ओलीस ठेवलं आहे. हे मी एका प्लॅन अंतर्गत केलं आहे.''

''लेस्ट चेंज फॉर मेक मी खरंच करणार होतो आणि करणार आहे. जर जिवंत राहिलो तर मी करेल. मेलो तर कुणी आणखी करेल पण नक्की करेल. मात्र होणार नक्कीच. याच मुलांसोबत घडेल, जर यांना काही इजा झाली नाही तर. कारण, तुमचं जरासही चुकीचं पाऊल मला ही संपूर्ण जागा पेटवून देण्यासाठी आणि मरण्यासाठी उद्युक्त करेल.''

 ''मी मरेल किंवा नाही मरणार मुलं विनाकरण दुखावली जातील.  ट्रॉमाटीईज होतील, त्याही पेक्षा अधिक काही झालं तर मला माहीत नाही. परंतु यासाठी मला जबाबदार धरलं जाऊ नये. यासाठी त्या लोकांना जबाबदार धरलं जावं, जे विनाकारण हे वाढवत आहे. कारण, सामान्य माणूस बोलू इच्छित आहे. माझं बोलणं संपल्यानंतर मी स्वत:च बाहेर येईल. मी एकटा नाही माझ्यासोबत अन्यही काही लोक आहेत. खूप लोकांना हा त्रास आहे, मी यावर उपाय घेणार आहे, बोलून. कृपया मला उद्युक्त करू नका.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

IND vs AUS Semi Final: जेमिमा रॉड्रिग्जचे खणखणीत शतक! हरमनप्रीत कौरची हुकली सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारी भागीदारी

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

Prakash Ambedkar : येत्या ३ महिन्यांत भारत-पाक युद्ध! वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टिका

SCROLL FOR NEXT