GOA
GOA 
मुंबई

गोव्यात जाण्यासाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा, कुलदीप घायवट

मुंबई : कोकण रेल्वे (kokan railway) मार्गावरून गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांना (travel to goa) आरटी-पीसीआर (Rt-pcr test report) निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गोवा प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. त्यामुळे मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल काढण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. तर, गोवा प्रशासनाने गोव्यांच्या रहिवाशांना, गोव्यात कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना, वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गोव्याला जाणाऱ्यांना आवश्यकतेनुसार सूट देण्यात आली आहे. (Rt-pcr test report compulsary for travel to goa)

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहेत. त्यामुळे कडक निर्बंध लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी बंगालमध्ये इतर राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. तर, आता गोवा प्रशासनानेही आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. रेल्वे मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या 72 तासांच्या आत घेतलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत घेऊनच प्रवास करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

तर, गोव्यातील रहिवासी असलेल्यांना वास्तव्याचा पुराव्याच्या आधारे, गोव्याला कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्राच्या आधारे आणि गोव्यात वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णाला वैद्यकीय पुराव्याच्या आधारे आवश्यकतेनुसार सूट देण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT