Ahmednagar  Esakal
मुंबई

RTE Ordinance Canceled: RTE प्रवेशाबाबतचा अध्यादेश अखेर हायकोर्टाकडून रद्द! लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

लाखो विद्यार्थ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिल्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत शिक्षण हक्क कायद्यांत बदल करणारा राज्य सरकारनं काढलेला अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. यामुळं राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. सरकारनं असा अचानक निर्णय घेणं हे घटनाबाह्य असल्याचं मत हायकोर्टानं नोंदवलं आहे. यामुळं लाखो गरीब विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

खासगी, विनाअनुदानित शाळांना आरटीईतून वगळ्याबाबत 9 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आरटीईमुळं सरकारी शाळांतील विद्यार्थी संख्या घटत असल्याचा दावा राज्य सरकारनं कोर्टात केला होता. खरंतर मे महिन्यांतच हायकोर्टानं या अध्यादेशाला स्थगिती दिली होती. पण आता हा अध्यादेशच आता कोर्टानं बेकायदा ठरवतं रद्द केला आहे.

मात्र, या काळात अन्य विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेश बाधित करु नयेत, असे निर्देशही हायकोर्टाचे दिलेत. तसंच शिक्षण मराठी की इंग्रजीतून घ्यायचं हा अधिकार पालकांचा आणि विद्यार्थ्याचा आहे. अचानक नवीन नियम करुन त्यावर गदा आणली जाऊ शकत नाही, हा याचिकाकर्त्यांचा दावा हायकोर्टानं मान्य केला. त्यामुळं सरकारनं केलेला बदल हायकोर्टानं रद्द ठऱवला.

आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासंदर्भातील राज्य सरकारचा फेब्रुवारीचा अध्यादेश हायकोर्टानं शुक्रवारी रद्द केला. तसेच खासगी शाळांना ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात बंधनकारक असल्याचं सांगितलं. यामुळं लाखो विद्यार्थ्यांच्या बाजूनं हायकोर्टानं शुक्रवारी निकाल दिल्यामुळं पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT