RTO Driving Test sakal
मुंबई

Mumbai RTO : अधिकारी छत्रीखाली खुर्चीवर बसून डायव्हिंग टेस्ट घेताहेत एजंट

वडाळा आरटीओ कार्यालयातील ड्रायव्हिंग टेस्ट ग्राउंड वरील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मोटार वाहन कायद्यांतर्गत चारचाकी आणि दुचाकी वाहन चालक परवाना चाचणी मोटार वाहन निरीक्षकानी त्यांच्या काटेकोर निरीक्षकांत आणि नियमांच्याअधीन राहून घ्यायची असते. वाहन चालकांचे वाहन चालवण्याचे कौशल्य बघूनच त्याला वाहन चालक परवाना द्यायचा असतो. मात्र, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावरील नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांकडून वाहन चालक चाचणीचे काम करून घेतले जात आहे.

चाचणीच्या वेळी या अधिकाऱ्यांचे उन्हापासून सुरक्षेसाठी छत्री लावण्यात येत असून, अधिकारी एकदाचा खुर्चीवर बसला, त्यानंतर चारचाकी आणि दुचाकीच्या वाहन चालवण्याची चाचणीचे सूत्र संपूर्णतः एजंट हाताळत असल्याचे प्रकार वडाळा आरटीओ कार्यालयात दिसून येत आहे.

परिवहन विभागाकडून कौशल्यपूर्ण चालक निर्माण होण्यासाठी वाहन चालक चाचणी काटेकोर घेण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यासाठी मोटार वाहन निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती असणे अनिवार्य आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निरीक्षकांऐवजी सहाय्यक अधिकाऱ्यांच्या मार्फत चाचणीचे काम करून घेतल्या जात आहे.

या अधिकाऱ्यांना वाहन चाचणीचे फार अभ्यास नसून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर पाहिजे त्याप्रमाणे वाहन चालक चाचणी पार पाडतात. शिवाय, एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक चाचण्या पूर्ण करत असल्याने त्यामध्ये उत्तम कौशल्यपूर्ण चालक निर्माण होत नसल्याचे परिवहन विभागातील एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळ शी बोलताना सांगितले आहे.

वडाळा आरटीओ मध्ये छत्री खाली बसून, टेबल खुर्ची राखणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वाहन चाचणीचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. एजंट त्यांच्या ग्राहकांच्या चाचण्या वेगाने पास करून घेत असल्याचे दिसून येत असून, वाहन चालवताना चालकांच्या चाचणीकडे अधिकाऱ्यांकडून कानाडोळा केला जात असल्याने दिवसाला शेकडो अप्रशिक्षित चालक रस्त्यावर येत आहे. त्यानंतरही याकडे वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

निरीक्षक आणि सहाय्यक दोघानाही वाहन चालवण्याची चाचणी घेण्याचे अधिकार आहे. लर्निंग लायसन्स फेसलेस झाल्याने मुख्यतः चाचणी घेतांना चालक दिव्यांग नाही हे प्राथमिकतेने बघितल्या जाते. शिवाय इतर गोष्टीही अधिकारी बारकाईने बघते. मात्र, यात दिरंगाई होत असल्यास पुन्हा सूचना देईल.

- विनय अहिरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, वडाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादांचा शेवटचा संवाद, कुणासोबत काय बोलले? विमान अपघाताआधीचा कॉल सर्वांना ऐकता येणार

Latest Marathi News Live Update : कोगील बुद्रुकचा कोतवाल लाच घेताना जाळ्यात; हजार रुपये घेताना कोल्हापुरात अटक

Accident : चार ऊसतोड कामगारांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; अज्ञात चालकावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana update : लाडक्या बहिणींना १५०० नाही २१०० देणार, योजना सुरू केलेल्या एकनाथ शिंदेंचे वक्तव्य

Candy Blast Incident : कँडी खाताच तोंडात स्फोट, तीन वर्षांच्या मुलीचा जबडा अन् गाल फाटला; धक्कादायक घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT