cars
cars  File photo
मुंबई

नव्या वाहन नोंदणीबद्दल RTO ने घेतला महत्त्वाचा निर्णय

प्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्य सरकारने लॉकडाउन घोषित केल्यानंतर 14 एप्रिल ते 1 मे पर्यंत आरटीओतील (RTO)सुरू आणि बंद राहणाऱ्या सेवांबद्दल आदेश काढले होते. त्याप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील कामकाज सोडून इतर सर्व कामे बंदच्या सूचना दिल्या होत्या, त्यानंतर आता पुन्हा नव्याने परिवहन आयुक्तांनी मंगळवारी आदेश काढले असून यामध्ये आधीच केंद्र सरकारने वाहनांसबंधीत कालमर्यादा संपणाऱ्या कागदपत्रांना 30 जून पर्यंत मुदतवाढ दिल्याने, सध्या आरटीओतील वाहनांसबंधीत (vehicle registration) कामे बंद ठेवण्यात आले आहे. (RTO took important decision regarding new vehicle registration)

यादरम्यान भरारी पथकांची रस्ता सुरक्षेचे वाहन तपासणी कामकाज सुरू राहणार आहे. तर वाहन अधिग्रहणाचे कामकाज केले जाणार आहे तर सार्वजनिक प्रवासी वाहनातून व खासगी प्रवासी बस मधून होणारी प्रवाशांची वाहतूक ही राज्य शासनाने जारी केलेल्या ब्रेक द चैन अंतर्गत सुरू असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांवर तपासण्याची जबाबदारी राहणार आहे. तर सीमा तपासणी नाक्यावरील कामकाज नियमित सुरू राहणार आहे.

लॉकडाउनपूर्वीच्या वाहनांच्या नोंदणीला परवानगी

राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन पूर्वीच वाहनांची खरेदी झाली आहे. शिवाय गुडीपाडव्याच्या निमित्ताने सुद्धा वाहन खरेदी झाली असल्याने यादरम्यान 13 एप्रिल पूर्वीच्या सर्व प्रकारच्या खरेदी व्यवहार झालेल्या वाहनांची नोंदणी केली जाणार आहे. मात्र 14 एप्रिल नंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांचीच खरेदी आणि नोंदणी केली जाणार आहे.

या प्रमाणे दिल्या आहे सूचना

नवीन वाहनांची नोंदणी

अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने व वाहन 4.0 प्रणालीवर ज्या वाहनाचे फिटनेस मोटार वाहन निरीक्षकाने अप्रुव्ह केले आहे. अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन वाहन नोंदणीचे कामकाज बंद राहील

वाहन विषयक कामे जसे की वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा चढवणे उतरवणे वाहन 4.0 प्रणालीवरप्राप्त झालेली व नियमांची पूर्तता करत असतील अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करावीत, नव्याने कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.

योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण

अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकणाचे कामकाज बंद राहील

परवाना विषयक कामकाज

वाहन 4.0 प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होणारी सर्व परवाना विषयक चालू ठेवण्यात येणार

- शिकाऊ अनुज्ञप्तीवबंद राहील

- पक्की अनुज्ञप्ती बंद राहील

- अनुज्ञप्ती विषयक इतर कामे जसे की, दुय्यम अनुज्ञप्ती जारी करणे, नूतनीकरण

सारथी 4.0 प्रणालीवर प्राप्त झालेली व नियमांची पूर्तता करत असतील अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करावीत, नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : मोहसीन खानने मुंबईला दिला तगडा झटका

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT