Crime News Sakal
मुंबई

Crime News : 'रमी सर्कल' खेळून कर्जबाजारी! कर्ज फेडण्यासाठी केली चोरी; खावी लागली जेलची हवा

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : रमी सर्कल वर गेम खेळण्याचा त्याला नाद लागला आणि त्यातून तो कर्जबाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी त्याने एका वृद्धेला लुटत पळ काढला. पण एका धाडसी तरुणाने अर्धा किमी पाठलाग करत त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधिन केले. ही घटना घडली आहे डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत.

नितीन ठाकरे असे चोरट्याने नाव आहे. कर्ज तर फिटले नाही, पण हाती पोलिसांच्या बेड्या पडल्याने त्याला जेलची हवा खावी लागली आहे. नितीन याला पकडून देणारा तरुण सर्वेश राऊत याने धाडस दाखवित चोरट्याला पकडून दिल्याने त्याचे कौतुक होत आहे.

डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिला सुवर्णा नेवगी या खरेदी करण्यासाठी बुधवारी दुपारी डोंबिवली पश्चिमेला गेल्या होत्या. खरेदी केल्यानंतर गांधी उद्याना जवळील रेल्वे पूलाच्या जीना चढून पूर्वेला जात होत्या. या दरम्यान नितीन हा त्यांच्या जवळ आला. त्याने सुवर्णा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला.

हा प्रकार तेथून जाणाऱ्या सर्वेश याने पाहीले. सर्वेश याने क्षणाचाही विचार न करता नितीन याचा पाठलाग सुरु केला. अर्धा किमी अंतरावर सर्वेशने नितीनला पकडले. याचवेळी येथून विष्णूनगर पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी जात असल्याने सर्वेशने नितीनला पोलिसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नितीनला अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली याचा अधिक तपास सुरु असून त्याने या आधी देखील चोरी केली आहे का ? याचा तपास केला जात आहे.

नितीन हा खासगी नोकरी करत असून त्याला रमी सर्कलवर गेम खेळण्याचा नाद लागला होता. या खेळामुळे तो कर्जबाजारी झाला होता. डोक्यावरील कर्जाचे ओझे कसे फेडायचे या विचारात तो असताना त्याने कर्ज फेडण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT