मुंबई

"माझी फाईल पुढेच जात नाही", धावपटू कविता राऊत यांनी राज्यपालांकडे केली तक्रार

सुमित बागुल

मुंबई : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. धावपटू कविता राऊत यांनी वर्ष २०१४ पासून सरकारी नोकरी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र कविता राऊत यांच्यानंतर ज्यांनी नोकरीचा अर्ज केला आहे त्यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाली आहे. अशात कविता राऊत या अद्यापही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणून कविता राऊत यांनी आता थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. 

कविता राऊत म्हणतात... 

याबाबत बोलताना धावपटू कविता राऊत म्हणाल्यात की, "२०१४ पासून मी वर्ग एक साठी अर्ज केला होता. त्यानंतर मी कायम याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बातचीत करून फॉलोअप घेत होते. माझ्यानंतर ज्यांनी वर्ग एक साठी ज्यांनी अर्ज केला होता त्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या. मला मात्र न्याय मिळालेला नाही.२०१८ मध्ये जी यादी निघाली त्यातही माझं नाव नव्हतं. मी ग्रामीण भागात लहानाची मोठी झाली आहे. मला ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी काम करायची इच्छा असून याबाबत विचार डोक्यात ठेऊन मी वर्ग एकसाठी अर्ज केला होता. मात्र मला अजूनही न्याय मिळाला नाही", अशी खंत कविता राऊत यांनी बोलून दाखवली.

पुढे बोलताना कविता राऊत यांनी शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागवार गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणतात, "राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणे हा माझ्यासाठी शेवटचा पर्याय होता. माझं कुठे चुकतंय किंवा मी खेळात कुठे कमी पडतेय असे प्रश्न आता मला पडतायत. शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाकडून माझ्या कामात अडचणी येत आहेत. माझी फाईल तिथून पुढे जात नाही आहे, असंही कविता राऊत म्हणाल्यात.

runner kavita raut met governor bhagatsingh koshyari about her application of government job as class one officer

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT