Fire Sakal
मुंबई

Bus Fire : नागपाडा येथे धावत्या बसला आग; १५ ते २० प्रवासी थोडक्यात बचावले

सांताक्रुझ बस आगारातील बस शनिवारी सकाळी ८.२० च्या सुमारास इलेक्ट्रिक हाऊस येथून सांताक्रुझ बस आगाराच्या दिशेने जात होती.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - सांताक्रुझ बस आगारातील बस शनिवारी सकाळी ८.२० च्या सुमारास इलेक्ट्रिक हाऊस येथून सांताक्रुझ बस आगाराच्या दिशेने जात होती. रुट नंबर सी - १, बस नंबर ७८९१ ही बस नागपाडा जे.जे रुग्णालय नागपाडा जवळ पोहोचताच बसने पेट घेतला. यावेळी बस मध्ये सुमारे १५ ते २० प्रवासी बचावले.

अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून अग्निशमन दलाचे अधिकारी स्थानिक पोलीस व बेस्ट उपक्रमाचे अधिकारी पुढील तपास करत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

सांताक्रुझ बस आगारातील बस रुट नंबर सी १, बस नंबर ७८९१ ही बस सांताक्रुझ बस आगार ते इलेक्ट्रिक हाऊस दरम्यान धावते. शनिवारी सकाळी इलेक्ट्रिक हाऊस येथून निघालेली ही बस जे.जे. रुग्णालय नागपाडा जवळ पोहोचताच बसने पेट घेतला. बसला आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

काय झाले हे स्पष्ट होण्याआधीच प्रवाशांनी मागच्या दरवाजाने बाहेर निघाले. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, बसच्या पुढच्या बाजुच्या टारयने पेट घेतला. या घटनेची चौकशी सुरु असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

लांब अंतरावर धावणाऱ्या या बस मध्ये नेहमीच मोठी गर्दी असते. परंतु आज असल्याने प्रवाशांची संख्या रोजच्या तुलनेने कमीच होती. सकाळी ही बस इलेक्ट्रिक हाऊस येथून सांताक्रुझ बस आगाराच्या दिशेने जात होती. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत प्रवासी कमीच होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT