SAAM TV Event
SAAM TV Event sakal media
मुंबई

साम टीव्ही आरोग्य संपदा सन्मान 2021; 19 सेवाव्रती देवदूतांचा सन्मान

कृष्ण जोशी

मुंबई : आपल्याच माणसांनी दूर लोटलेल्या कोरोनाग्रस्तांना (corona patients) जवळ घेऊन माया लावणाऱ्या आणि कोरोनाच्या साथीतही समाजासाठी चंदनाप्रमाणे झिजून नवी कर्तव्यशिखरे ओलांडणाऱ्या 19 सेवाव्रती देवदूतांना (corona warriors), साम टीव्ही आरोग्य संपदा सन्मान (Saam TV event) 2021 या दिमाखदार सोहळ्यात गौरविण्यात आले. दीड वर्षांची कोरोनाची काळरात्र संपून नवी आशादायी पहाट सुरु होत असल्याची साक्ष देणारा हा सोहळा होता, अशी प्रतिक्रियाही यानिमित्ताने उपस्थितांनी एकमुखाने व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील जे. डब्ल्यू. मॅरियट या पंचतारांकित हॉटेलात गुरुवारी संध्याकाळी साम दूरचित्रवाणी वाहिनीतर्फे आयोजित असा हा समारंभ रंगला. यात निवडक डॉक्टर, उद्योजक, समाजसेवक, सरकारी अधिकारी अशा कोरोना योद्ध्यांना गौरविण्यात आले. आपल्या लाडक्यांचा सन्मान पाहण्यासाठी सत्कारमूर्तींचे कुटुंबीयदेखील आवर्जून आले होते.

आकर्षक फेटे घातलेल्या सत्कारमूर्तींचे फोटो काढणे, सन्मानचिन्ह-मानपत्रे पाहण्यासाठीची त्यांची लाडिक स्पर्धा, त्यासह सेल्फी काढण्यासाठी धडपड, मान्यवरांचे दोन कौतुकाचे शब्द ऐकण्यासाठी आसुसलेले त्यांचे कान, अशी त्यांचीही मौजमस्ती सुरु होती. साम टीव्ही ला प्रतिक्रिया देताना तर त्यांना काय सांगू अन काय नको असे झाले होते. कोरोनाच्या काळ्या खंडातील अंगावर काटा आणणाऱ्या नकोशा भीतीदायक आठवणी बाजूला सारून नवी आशादायी पहाट सुरु होत असल्याची साक्षच या कार्यक्रमामुळे मिळाली, असेही सर्वांनी बोलून दाखवले.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्वतः आघाडीवर राहून कोरोना योद्ध्यांना दिशा दाखवणारे आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या मान्यवरांनी सत्कारमूर्तींची मुक्तकंठाने प्रशंसा केलीच. पण साम च्या या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल कौतुकही केले. त्यांच्यासह सकाळ माध्यमसमूहाचे सीईओ उदय जाधव, साम टीव्हीचे सरव्यवस्थापक (सेल्स) अमित सिंह आदींनी या मान्यवरांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. किर्ती किल्लेदार, मंगेश बोरगावकर तसेच निलेश मोहरीर यांच्या सुरेल मैफिलीने या सोहळ्याला हिरेमाणकांची झळाळी आली. यामुळे सत्कारमूर्ती व त्यांचे कुटुंबीय आनंदित तर झालेच.

पण सध्याच्या व्हर्चुअल च्या युगात प्रथमच स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स करायला मिळाल्याने या कलाकारांचा आनंदही द्विगुणित झाला. टास्क फोर्स चे सदस्य डॉ. तात्याराव लहाने हे देखील यावेळी अवर्जून उपस्थित होते. या सत्कारमूर्तींपैकी कोणी कोरोनाग्रस्तांची सेवा केली, तर कोणी कोरोनाग्रस्त महिलांची प्रसूती केली, कोणी रोजगारनिर्मितीचे तर कोणी गावागावांमध्ये सॅनिटरी पॅड वाटपाचे काम सुरुच ठेवले, कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्यास अन्य काही डॉक्टर घाबरत असताना काही रुग्णालयांनी विश्रांती न घेता आपले व्रत अखंड सुरु ठेवले, कोणी अगदी स्वच्छतेपासून पडेल ती समाजसेवा केली तर नगरविकास मंत्र्यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी राहुल गेठे यांनी ग्रामीण भागात जाऊन वैद्यकीय सामुग्री पुरविण्यात महत्वाचा वाटा उचलला.

या सत्कारमूर्तींचे काम मोठेच होते व त्यांच्यासारख्याच अशा असंख्य देवदूतांनी गेल्या दीड वर्षांत जनसेवेची आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. त्यांच्याचमुळे महाराष्ट्र कोरोनाच्या भीतीदायक सावटातून बाहेर पडला, अशीच भावना या समारंभात मान्यवरांनी बोलून दाखवली. त्यादृष्टीने या 19 जणांचा सत्कार प्रातिनिधिक होता, याची विनम्र जाणीव या सत्कारमूर्तींना देखील होती.

कोविडच्या दोन लाटा येऊन गेल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची भीती असताना आपण कोठे जात आहोत हा तणाव आहेच. त्यामुळे अशा वातावरणात आपली दृष्टी सकारात्मक रहावी यासाठी असे सोहळे, त्यातील लाईव्ह परफॉर्मन्स महत्वाचे आहेत, असे साम चे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले. गेल्या दीड वर्षांत आरोग्य क्षेत्रात सरकारला सहकार्य करण्यासाठी विविध संस्था, व्यक्ती यांनी कर्तव्यभावनेपलिकडे जाऊन कामे केली, उद्योजकांनीही या अडचणीच्या दिवसांत अर्थचक्र फिरत ठेवले व राज्याने कोविडवर मात करून प्रगती केली. त्यामुळे आरोग्य आणि संपदा क्षेत्रातील या कोरेना योद्ध्यांचे कौतुक करण्यासाठी हा सोहळा आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

1. हेच खरे आयडॉल - सोनाली कुलकर्णी

आजचे हे सत्कारमूर्ती हेच खरे आयडॉल आहेत, तुमच्या प्रत्येकावरचा सिनेमा आमच्या मनाला उभारी देत आहे. आपण प्रत्येकाने असे प्रामाणिकपणे काम केले तर आवाक्याबाहेरचा कोरोना लढा यशस्वी करणे काहीच कठीण नाही. आपण प्रत्येकाने सत्कारमूर्तींकडून प्रेरणा घेऊन कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात कार्यकर्ता होण्याची गरज आहे.

2. बातमी जी व्यवस्था बदलेल या उक्तीप्रमाणेच काम - राजेश टोपे

बातमी जी व्यवस्था बदलेल या उक्तीप्रमाणे सामाजिक भान ठेऊन प्रागतिक विचारांनी समाजमन बनवण्यासाठी साम-सकाळ ने आयोजित केलेला हा उपक्रम इतरांना प्रेरणादायी आहे. तिसरी लाट, चिंता-काळजी हे शब्द आता आपल्या शब्दकोषातून काढून टाका. चिंता न करता कोविडसंदर्भात काळजी घेऊनच समाजात वावरा. अजूनही चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद आहेत, पण हे थोडेच दिवस असून ते लौकरच जातील. नकारात्मकता बाजूला ठेऊन सकारात्मक दृष्टीकोन अवलंबून काम करूया, इश्वर आपली नक्कीच काळजी घेईल.

3. माध्यमांवर राग ठेवला नाही - बाळासाहेब थोरात

गेल्या सत्तर वर्षांच्या शांततेनंतर जगाला धक्का देणारे हे कोरोनाचे संकट होते. यातून समाजाला वाचविण्यात मोठा वाटा उचलणारे हे पुरस्कारविजेते कौतुकास पात्र आहेत. शहरे बंद असली तरी त्यांची व्यवस्था सुरु ठेवण्यासाठी या योद्ध्यांनी जीव धोक्यात घालून काम केले. राज्य सरकारनेही मृत्यू न लपवता पारदर्शकपणे काम केले, ज्यांनी मृत्यू लपवले तेथे स्मशानभूमीनेच सत्य सांगितले. प्रसारमाध्यमांनीही आमच्या चुका दाखवल्या तरीही आम्ही राग ठेवला नाही. यातूनच सर्व चांगले झाले.

कॉफीटेबल बुक

सह प्रायोजक तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे स्वागत तोडकर व तुषार भुमकर इन्स्टिट्यूट प्रा. लि चे तुषार भुमकर यांचे स्वागत उदय जाधव आणि अनिल सिंह यांनी केले. यावेळी या सन्मान सोहळ्याच्या कॉफीटेबल बुक च्या मुखपृष्ठाचे अनावरण मान्यवरांनी केले.

साम आरोग्य संपदा सन्मान 2021 पुरस्कारविजेते

1. डॉ. गणेश आणि शिवांजली पोटभरे वाळके पाटील. (शांताई मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल)

2. वॉलसन इंडस्ट्रीज (संजय वामन बगे)

3. तुषार भूमकर, संस्थापक टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी.

4. उमादेवी सीताराम बैरागी हॉस्पीटल फर्टिलिटी अँड रीसर्च सेंटर, कल्याण.

5. डॉ. साईनाथ बैरागी.

6. डॉ. आय. जी. पटेल. (आयुर्वेद तज्ञ, कॅन्सर इम्युनोथेरेपी विशेषज्ञ)

7. डॉ. राहूल गेठे. (नगरविकासमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी)

8. के. के. हर्बल. (कृष्णा कदम व कन्हैय्या कदम)

9. निरामय वेलनेस सेंटर, (डॉ. योगेश आणि डॉ. अमृता चांदोरकर. )

10. इंदू केअर फार्मा प्रा. लि., (डॉ. रामदास कुटे.)

11. डॉ. दत्तात्रय अंगद चोपडे पाटील, डॉ. पूजा दत्तात्रय चोपडे पाटील

12. डॉ. हेमंत दत्तात्रय चौधरी.

13. गणेश किशोर तुप्पद

14. मॉडर्न होमिओपथी, डॉ. विजयकुमार माने.

15. स्वागत तोडकर.

16. डॉ. मिलिंद शिंदे (विजय मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, अंबरनाथ.)

17. रियाज शमनजी.

18. डॉ. निवेदिता आनंद पवार (निवेदिता मॅटर्निटी होम).

19. पल्लवी जैन, क्रष्णा डायग्नोस्टिक सेंटर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT