Sachin Tendulkar 
मुंबई

Sachin Tendulkar Video: सचिन तेंडुलकरने कुटुंबासह घेतले मुकेश अंबानींच्या घरी बाप्पाचे दर्शन!

Sandip Kapde

Sachin Tendulkar: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर त्याच्या कुटुंबासह गणेश चतुर्थीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानी गेले होते. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राज्यात 10 दिवसांचा गणेशोत्सव सुरू आहे. नेते, अभिनेते, प्रसिद्ध उद्योगपती यांच्या घरी बाप्पाची स्थापना करण्यात आली. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी कुटुंबीयांसह बाप्पाचे घरी स्वागत केले. या खास कार्यक्रमात अँटिलियाला सजवण्यात आले होते. बॉलीवूड आणि क्रिकेटमधील अनेक सेलिब्रिटींनीही गणपती पूजेत सहभाग घेतला.
 
नीता अंबानी येथे पूजेदरम्यान मुलगी ईशासोबत दिसल्या. अनंत अंबानी, राधिका मर्चंट देखील उपस्थित होते. या विशेष सोहळ्यात सर्वांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. मुकेश यांचे भाऊ अनिल अंबानीही पत्नी टीनासोबत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते.

पूजेत बॉलिवूडमधील कलाकार सहभागी -

बॉलिवूडमधून कतरिना कैफ, काजोल माधुरी दीक्षित, सुनील शेट्टी, विकी कौशल, आमिर खान, अनिल कपूर, ईशा कोप्पीकर, अनु मलिक, विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत येथे पोहोचले होते. आलिया भट्टसोबत रणबीर कपूर येथे पोहोचला. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राही या विशेष पूजेचा भाग झाला.
 
माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुनसोबत अंबानींच्या घरी पोहोचला. क्रिकेटपटू पार्थिव पटेल आणि हार्दिक पांड्याही दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Police Report : नसरापूर प्रकरणातली पोलिस रिपोर्ट आला; भीमराव कांबळेने गाठी शेव खायला देण्याचं आमिष दाखवलं अन्...

LPG Rules India : एलपीजी वापरणाऱ्यांसाठी मोठा इशारा ! ... तर तुमचं कनेक्शन बंद होऊ शकतं, जाणून घ्या नवीन नियम

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका! दुसऱ्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

CIBIL स्कोर चेक करायला एक रुपयाही होणार नाही खर्च; काही सेकंदात मिळेल संपूर्ण रिपोर्ट, 'इथे' पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणावरुन पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT