Sachin-Waze-woman 
मुंबई

सचिन वाझेसोबत 5-स्टार हॉटेलमध्ये असणाऱ्या महिलेची NIAकडून चौकशी

विराज भागवत

मुंबई: सचिन वाझे प्रकरण हे सध्या महाराष्ट्रातील बहुचर्चित प्रकरणांपैकी एक आहे. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होताना दिसत आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण अशा दोन्ही प्रकरणाचा तपास सध्या NIA करत आहे. याच तपासादरम्यान, सचिन वाझे हा दक्षिण मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये १०० दिवस वास्तव्यास असल्याचे उघड झाले. त्याच्यासोबत एक महिलादेखील असल्याची माहिती होती. त्या महिलेची NIAने गुरूवारी कसून चौकशी केली. NIAचे पथक या महिलेचा तपास करत होते. अखेर गुरुवारी NIAने त्या महिलेच्या घरी धडक मारली.

NIAच्या पथकाने त्या महिलेचे नाव किंवा ओळख अद्याप उघड केलेली नाही. मात्र त्या महिलेच्या घराची काल झाडाझाडती घेण्यात आली. तसंच तिची दीर्घ काळ कसून चौकशी करण्यात आली, असं NIAच्या अधिकाऱ्याने सांगितले. सचिन वाझेसोबत असलेल्या या महिलेकडे वाझेचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम होते. ती दोन वेगळ्या ओळखपत्रांसह हे काम करायची. वाझेकडे असणाऱ्या काळ्या मर्सिडीजमधील नोटा मोजण्याच्या मशिनचा वापर ही महिला करत अशा माहिती NIAच्या अधिकाऱ्यांनी दिली.

NIAने गुरूवारी बाबुलनाथ येथील हॉटेल कम क्लबमध्येही शोधकार्य हाती घेतले. त्या क्लबमधून सचिन वाझेने वापरलेल्या ८ सिम कार्ड्ससंबंधीची कागदपत्रे मिळाली असल्याचा दावा NIAने केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाझेच्या सांगण्यावरूनच नरेश गोरला या कटात सामील करून घेण्यात आले. वाझेने वैयक्तिक वापरासाठी नरेश गोरकडून आठ सिम कार्ड्स मागून घेतली. गोरने गुजरातमधून ही सिम कार्ड्स आणून सचिन वाझेचा विश्वासू विनायक शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली, असं NIAच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT