Sachin waze sakal media
मुंबई

वाझेची चांदिवाल आयोगासमोर उलट तपासणी; प्रश्नांना काय दिली उत्तरे?

सकाळ डिजिटल टीम

चांदिवाल आय़ोगासमोर मुंबई पोलिसातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाजे याची उलटतपासणी करण्यात आली.

मुंबई - चांदिवाल आय़ोगासमोर मुंबई पोलिसातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाजे याची उलटतपासणी करण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेसुद्धा आयोगात पोहोचले होते. अनिल देशमुख यांच्या वकिलाकडून वाजेची उलट तपासणी घेण्यात आली. यात वाझेने काही प्रश्नांची उत्तरे देताना आपल्याला आठवत नाही असं सांगितलं. ८ डिसेंबर रोजी वाजेला चांदिवाल आयोगात वकिलांना भेटण्यासाठी आयोगाची परवानगी देण्यात आली आहे. तर ९ डिसेंबर रोजी देशमुख चांदिवाल आयोगात वकिलांना भेटण्यासाठी आयोगाची परवानगी मिळाली आहे. पुढची सुनावणी १३ डिसेंबर रोजी १२:३० वा. ला घेण्याची विनंती केली अनिल देशमुखाच्या वकिलांनी केली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त परम बीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचा आरोप केला होता. पोलिसांच्या मदतीने खंडणीचं रॅकेट चालवत असल्याच्या या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली आहे. सध्या अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर एनआयएने अटक केल्यानंतर वाजेला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. शुक्रवारी विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांना चांदिवाल आयोगासमोर हजर करण्यास परवानगी दिली होती.

उलट तपासणीत काय विचारले?

Q - संपूर्ण महाराष्ट्रात किती सहाय्यक पोलस निरीक्षक आहेत अंदाजे

A - महाराष्ट्रात अंदाजे ५ हजार असतील

Q - यातील मुंबई पोलिस दलात किती जण कार्यरत आहे

A - मुंबईत अंदाजे २हजार ५०० जण कार्यरत असतील

Q - ज्यावेळी गृहमंत्र्या़ना कुठल्या गुन्ह्यांची माहिती कोण देत

A - संबधित अधिकारी वरिष्ठा़च्या परवानगीने देतात

Q - पाच ते सहाजण जाऊन माहिती देतात

A - हे सर्व गृहमंत्री याच्या आदेशावर अवलंबून असतं

Q - अनिल देशमुखा़ंना तुम्ही फक्त शासकिय कामासाठी भेटत होतात

A - शासकिय कामा संदर्भात भेटत होतो

Q - तुम्ही शासकिय कामा व्यतिरिक्त ही भेटत होतात

A - मला आठवत नाही

Q - तुम्ही कुंदन शिंदेला ओळखता का ?

A - मी त्या़ंना वैयक्तिक ओळखत नाही. मात्र ते गृहमंत्री याचे स्वीय सहाय्यक असल्याचे माहित होत़ं

Q - तुमचं कधी त्यांच्याशी बोलणं झालं

A - आठवत नाही

Q - मंत्रालयात पोलिसांना जाण्यासाठी काय प्रक्रिया आहे.

A - मंत्रालयात जाण्यासाठी पोलिसा़ंना परवानगी घ्यावी लागते संबधित व्यक्तीला भेटणार त्याची...

Q - पोलिसांना मंत्रालयात जाण्यापूर्वी इंट्री करावी लागते का ?

A - संबधित व्यक्ती ज्याला भेटणार आहे ती खाली गेटवर मेसेज देतात. त्यानुसार इंट्री करून सोडतात. मात्र मला त्या बद्दल अधिक माहित नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Accident : BMW-Porsche Car ची पश्चिम द्रुतगती महामार्गावर शर्यत; कार पलटी होऊन भीषण अपघात, चालक गंभीर जखमी

Gautami Patil : सगळीकडे गौतमचीच हवा ! सोनचाफा गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकुळ

Gokul Milk Kolhapur : ...तर शनिवारपासून गोकुळ संघाला दूध देणार नाही, आगामी निवडणुकीत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडण्याची तयारी

Pune MSRTC News : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीनिमित्त पुण्यातून 'एसटी'च्या ५९८ जादा गाड्या; 'या' कालावधीत धावणार Buses

MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅटट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!

SCROLL FOR NEXT