Sachin waze and Parambir singh sakal media
मुंबई

वाझे-परमबीर सिंग यांच्यात बंद खोलीत तासभर चर्चा, पोलिसांची भूमिका काय?

बंद खोलीत चर्चा झाली, त्यावेळी वाझे आणि परमबीर यांच्यासोबत त्यांचे वकिलही तिथे हजर होते.

सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मन्सुख हिरेन हत्या (Mansukh hiren murder) प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे (Sachin waze) आणि परमबीर सिंग यांच्यात आज बंद दाराआड तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) अखेर चांदीवाल आयोगासमोर (chandiwal commission) हजर झाले. सुनावणीनंतर बंदखोलीत ही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. तो एक आरोपी आहे. असं असतानाही दोघांमध्ये तासभर चर्चा कशी होऊ शकते? या प्रकाराने मुंबई पोलिसांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता मुंबई पोलीस परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या बैठकीची चर्चा करणार असल्याची माहिती आहे. बंद खोलीत चर्चा झाली, त्यावेळी वाझे आणि परमबीर यांच्यासोबत त्यांचे वकिलही तिथे हजर होते.

अनिल देशमुख यांच्या वकिलांनी वाझे आणि सिंह यांची भेट आणि चर्चेवर आक्षेप घेतला. त्यावर चांदीवाल आयोगाने "ही भेट कोर्टाबाहेर झालीय , त्यामुळे आपण त्यावर काही करू शकत नाही" असं म्हटलंय. सचिन वाझे प्रकरणामुळेच परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हटवलं. त्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजप उमेदवाराला लोकांनी घरातच कोंडलं

Akol crime: अकोल्यात रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगलानं संपवलं जीवन; सरत्या वर्षाला निरोप अन् उचलले टोकाचे पाऊल!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या भेटीला

India Squad For New Zealand ODIs : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट, मोहम्मद शमी पुन्हा दुर्लक्षित! भारताच्या वन डे संघात अचंबित करणारे निर्णय...

Daily Good Habits: मन फ्रेश अन् अ‍ॅक्टिव ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ‘हा’ कानमंत्र पाळा, तणाव होईल गायब

SCROLL FOR NEXT