Saipaksha Shrikant Shinde Ulhasnagar Chief Minister Eknath Shinde politics mumbai  sakal
मुंबई

उल्हासनगरातील साईपक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सोबत!

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून सत्तेच्या केंद्रस्थानी राहणाऱ्या उल्हासनगरातील साईपक्षाने आज खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ.श्रीकांत शिंदे हे कडोंमपाच्या कल्याण पुर्व मधील डी वॉर्ड कार्यालय परिसरात सुरू असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी आणि कार्यकर्ता संवाद साधण्यासाठी आले होते.तेंव्हा साईपक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांच्या सोबत माजी नगरसेवक बाबू मंगतानी,नवीन दुधानी,माजी नगरसेविका इंदिरा उदासी आदींनी डॉ.शिंदे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे सोबत राहणार असा निर्णय जाहीर केला.

एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना डॉ.शिंदे यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या निधीमुळे विरोधी पक्षात असतानाही साईपक्षाच्या प्रभागात विकासकामे झाली आहेत.शिंदे हे विकासकामात हेवेदावे मतभेद करत नसून हा स्वभावच त्यांची जमेची बाजू आहे.त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार.श्रीकांत शिंदे यांच्या सोबत राहणार असे जीवन इदनानी यांनी सांगितले.यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण आशान उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT