मुंबई : बदलत्या पर्यावरणाचा माणसाच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामाचा वेध घेणाऱ्या ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाला मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ‘गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक दिवाळी अंक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचा वितरण समारंभ शनिवारी, २६ फेब्रुवारीला दादर सार्वजनिक वाचनालयाच्या धुरू सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
‘सकाळ’च्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पर्यावरणवादी लेखिका सुनीता नारायण, विष्णू लांबा, प्रसिद्ध अभिनेत्री आणि पर्यावरण चळवळीच्या कार्यकर्त्या जुही चावला, डॉ. सरिता सुब्रह्मण्यम, मारुती चितमपल्ली, किशोर रिठे, डॉ. संग्राम पाटील, डॉ. शरद काळे, राहुल गडपाले, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. प्राक्तन वडनेरकर, शिल्पा गडमडे, एन. वासुदेवन, डॉ. सुरेश चोपणे, सुमैरा अब्दुलअली, प्रा. संदीप पेटारे, किरण येले, अमोल खरात, ऋषिराज तायडे यांच्या महत्त्वपूर्ण लेखांसह पर्यावरणावर भाष्य करणाऱ्या कवितादेखील आहेत. ‘अवतरण’ अंकाला मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या ४६ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिली.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि गोरेगावच्या मराठी विचारधारा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी भाषा दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या वेळी ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक दत्ताराम गवस आणि श्रीराम मांडवकर यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवित केले जाणार आहे; तर ‘वाचन चळवळीतील सेवाभावी कार्यकर्ता पुरस्कार’ अश्विनी पाठक यांना प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ चित्रपट-नाट्य अभिनेत्री चिन्मयी सुमित, शिवसेना आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार, उद्योजक प्रमोद घोसाळकर हे समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
इतर विजेते
‘सकाळ’च्या दिवाळी अंकासह तरुण भारत (नागपूर), प्रसाद (पुणे), ऋतुरंग (मुंबई), चिकू पीक (पुणे), आनंद तरंग (पुणे), पुढारी दीपस्तंभ (कोल्हापूर), ऋतुपर्ण (पुणे) या दिवाळी अंकांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. काही अंकांचा उत्कृष्ट व उल्लेखनीय अंक म्हणून गौरव होणार असल्याचे संस्थेचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.