मुंबई

सकाळ सन्मान सोहळा: आपत्तीकाळात यंत्रणा लोकांच्या पाठीशी, कोरोना योद्धांचे शरद पवारांकडून कौतुक

कृष्ण जोशी

मुंबई: महाराष्ट्राची प्रशासनयंत्रणा देशात वेगळीच आहे, ही अर्धशासकीय यंत्रणेची संकल्पना आपण पहिल्यापासून जोपासली आहे. त्यामुळे अपत्तीच्या काळातही प्रशासनातील कनिष्ठ कर्मचारी ते मुख्य सचिवांपर्यंत सर्वजण संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले. संकट काळात समाजाला मदत करणारे योद्धे नव्या पीढीला प्रोत्साहन देतात. या सत्कारासाठी खूप लोक पात्र आहेत, मात्र सर्वांचीच निवड करता येणार नाही. कोरोना काळात सरकारच्या प्रतिनिधींनी चांगली कामगिरी केली. सत्कारमूर्तींसह मंत्र्यांनी अखंड काम केले, मालेगावच्या अधिकारी आरती सिंह सारखी शेकडो उदाहरणे आहेत. त्यांच्यामुळेच आपण हळुहळू कोरोना संकटातून बाहेर पडतो आहोत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच महाराष्ट्राची स्थिती सुधारली, हे प्रयत्न करणारे सर्वच जण कोरोना योद्धे आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्वांचे कौतुक केले.

कोरोनावर मात करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांना गौरविणारा सकाळ सन्मान 2021 हा कार्यक्रम शनिवारी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला. कोरोनाला पराभूत करण्यात वाटा उचलणारे शवागृहातील कर्मचारी कमलेश सोळंकीपासून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे अशा लहानथोर कोरोनायोद्ध्यांचा सत्कार झाल्याने सर्वचजण भारावून गेले. विशेषतः सकाळने सामाजिक बांधीलकीचा जाण ठेऊन हा कौतुकसोहळा आयोजित केल्याने सर्वच पुरस्कार विजेते हरखून गेले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नाट्य, अभिनय, समाजसेवा क्षेत्रातील मान्यवर आदींच्या उपस्थितीने हा सोहळा अत्यंत रंगतदार झाला.

वर्तमानपत्र वाचकांसाठीच
 
सकाळचे संस्थापक ना. भि. परुळेकर यांचा या सोहळ्यात ठाकरे यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पहिल्या पानावर लहान मथळ्यात जास्तीत जास्त बातम्या सकाळ का देतो, याचे कारण सांगताना वर्तमानपत्रांतील सर्व जागेवर वाचकांचा हक्क असतो, असे उत्तर परुळेकर यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. असे व्रत घेतलेल्या महर्षीचा वारसा सकाळ आजही पुढे नेत आहे. बातम्या, लेख देताना त्याबरोबरच सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे महत्वाचे असते, ते जपण्याची बांधिलकी सकाळ ने या कार्यक्रमातही दाखवली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सकाळ चे कौतुक केले.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Sakal honors ceremony ncp chief sharad pawar Appreciation Corona warriors

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT