Sakal Premier Award 2023 Dharamveer film city sakal
मुंबई

Sakal Premier Award 2023 : ठाण्यात धर्मवीर चित्रपटसृष्टी उभी करणार; श्रीकांत शिंदे

श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

Sakal Premier Award 2023

ठाणे : धर्मवीर सिनेमा बनवतांना अनेक अनुभव आले. त्या अनुभवाची शिदोरी घेऊन ठाण्यामध्ये 'धर्मवीर चित्रपट सृष्टी' उभी करणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असल्याचे ही त्यांनी सांगितले.

सकाळ माध्यम समूहाच्या प्रीमियर अवॉर्ड २०२३ सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

राजदत्त यांनी अनेक दर्जेदार सिनेमा बनवले. या चित्रपटांनी मराठी चित्रपट सृष्टी अधिक समृद्ध केली. यातील अनेक चित्रपट पाहिले आहेत. मात्र अलीकडे हे चित्रपट बघायला मिळत नाही. त्यामुळे नवीन पिढीपर्यंत दर्जेदार चित्रपट पोहचत नाहीत.अश्या कलाकृती 'चित्रपट महोत्सव' च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही शिंदे यावेळी म्हणाले.

प्रीमियर अवॉर्ड सोहळा ठाण्यामध्ये आयोजित केल्याबद्दल त्यांनी सकाळ चे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. सकाळची ९१ वर्षांची परंपरा आहे.अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी आपली ही परंपरा कायम सुरू ठेवली हे स्तुत्य आहे.

आज ही त्यांनी भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि कालाकृतींचा सन्मान करून त्यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केल्याबद्दल ही शिंदे यांनी सकाळ माध्यम समूहाचे त्यांनी कौतुक केले.

एखाद्या हिरोला शोभणारा चेहरा असल्याने आपण कधी कॅमेरा च्या पुढे येण्याचा प्रयत्न कराल का यावर उत्तर देतांना त्यांनी सांगितले, की मी नेता आहे,अभिनेता झालो तर जास्त होईल अशी मिश्किल टिप्पणी ही त्यांनी शेवटी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे १२ स्थानके तयार, आता फक्त सरकारच्या निर्णयाची वाट!

Kolhapur Illegal Gravel Mining : कोल्हापूरचा बिहार होतोय का? प्रांताधिकाऱ्यांना खडी चोरीची टीप दिली अन् थेट डंपर अंगावर घातला

Latest Marathi News Live Update : २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकणात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज

Chhatrapati Sambhajnagar: शीतपेयातून पत्नीसह दोन मुलांवर विषप्रयोग; उपचारादरम्यान चारवर्षीय मुलाचा मृत्यू

Viral Video : आरटीओ कारवाईपासून वाचण्यासाठी चालकाने धावत्या डंपरमधून एक्सप्रेसवे वर सांडले दगड; वाहतूक ठप्प, पोलीस फावडे घेऊन लागले कामाला

SCROLL FOR NEXT