Sakal Premier Award sakal
मुंबई

Sakal Premier Award : ठाण्यात ‘सकाळ प्रीमियर अॅवॉर्ड्स’ सोहळा; रकुल प्रीत सिंह, श्रिया पिळगावकर यांचा विशेष सन्मान

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध वेबसीरिजमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणारी श्रिया पिळगावकर यांना ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड्‌स’ सोहळ्यात विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार.

सकाळ वृत्तसेवा

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध वेबसीरिजमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणारी श्रिया पिळगावकर यांना ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड्‌स’ सोहळ्यात विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार.

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी सिनेविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध वेबसीरिजमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणारी श्रिया पिळगावकर यांना ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड्‌स’ सोहळ्यात विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. येत्या बुधवारी (ता. १२) ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. पीएनजी ज्वेलर्स लि. पुरस्कार सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने २०१४ मध्ये ‘यारियाँ’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले. त्यानंतर ‘दे दे प्यार दे’, ‘अटॅक’, ‘डॉक्टर जी’, ‘कठपुतली’ इत्यादी अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने चाहत्यांची मने जिंकली. काही महिन्यांपूर्वीच रकुलची मुख्य भूमिका असलेला ‘छत्रीवाली’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. त्यालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

गेली काही वर्षे ओटीटीवर अनेक वेबसीरिजमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत अभिनेत्री श्रिया पिळगावकरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. २०१८ मध्ये ‘मिर्झापूर’ वेबसीरिजमधून श्रियाने ओटीटीवर पदार्पण केले. त्यात तिने साकारलेल्या ‘स्विटी’च्या भूमिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यापाठोपाठ श्रियाने ‘द गॉन गेम’, ‘क्रॅकडाऊन’, ‘गिल्टी माईण्डस्’ आणि ‘द ब्रोकन न्यूज’ अशा अनेक वेबसीरिजमधील अभिनयाने सर्वांची मने जिंकून घेतली. दोघींच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली आहे.

या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत, मानसी नाईक, नेहा महाजन, रोहित शिवलकर, अमिता कुलकर्णी, पुष्कर जोग आणि स्वामिनी वाडकर विविध नृत्याविष्कार सादर करणार आहेत. त्यांच्या जोडीला तृप्ती खामकर चटकदार विनोद घेऊन प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी सोहळ्याला आवर्जून हजेरी लावणार आहेत. एकापेक्षा एक सरस चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विविध विभागांसाठी त्यांच्यात जबरदस्त चुरस रंगली आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट इत्यादी पुरस्कारांबरोबरच काही विशेष पुरस्कारही दिले जाणार आहेत.

पुरस्कारासाठी चुरस

राहुल देशपांडे, मनीष राजगिरे, अभय जोधपूरकर आणि हृषिकेश रानडे यांच्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी; तर आर्या आंबेकर, आनंदी जोशी, श्रेया घोषाल व मुग्धा कऱ्हाडे यांच्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी चुरस रंगणार आहे. उमेश जाधव, आशीष पाटील, किरण बोरकर आणि दीपाली विचारे यांच्यात सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकासाठी स्पर्धा आहे. विविध विभागांमधील नामांकन यादी जाहीर झाल्यानंतर आता सोहळ्याची चर्चा सुरू झाली आहे. अंतिम निकाल जाणून घेण्यासाठी सर्वांना आतापासूनच उत्सुकता लागून राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT